अमृत पाटील यांना काव्य गौरव पुरस्कार

नवी मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार अमृत पाटील नेरुळकर यांना रविवारी कोकण मराठी साहित्य परिषदेचा मानाचा काव्य गौरव पुरस्कार पालघर येथील सहाव्या महिला साहित्य संमेलनात ज्येष्ठ कवयित्री निरजा यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

       यावेळी व्यासपिठावर  ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, खा. सुप्रिया सुळे, नियामक मंडळाचे अध्यक्ष खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, संमेलनाध्यक्ष मोनिका गजेंद्रगडकर, ज्येष्ठ कवयित्री निरजा, अभिनेत्री निशिगंधा वाड, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्यध्यक्ष प्रदीप ढवळ, विश्वस्त रमेश कीर आदी मान्यवर उपस्थित होते.

      वाचन संस्कृती ही माणसाला दिशा दाखविण्याचे काम करते. असे असले तरीही तिला आलेली मरगळ पाहून वेदना होतात. अशी खंत व्यक्त करतानाच साहित्यिक हा समाजातील एक चिंतनशील व जबाबदार घटक आहे. म्हणूनच साहित्यिक व्यासपीठावरुन आता चाकोरी बाहेरच्या विषयांवरही समाज परिवर्तनाची चर्चा होणे गरजेचे आहे. असे मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केले.

       कोकण मराठी साहित्य परिषद ही एक नामांकित संस्था असून या संस्थेने माझ्यावर दाखविलेला विश्वास मोलाचा असून या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली असल्याची प्रतिक्रिया यावेळी गौरवमूर्ती अमृत पाटील नेरुळकर यांनी दिली.

 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणमंत्र्यांनी केले महापालिका विद्यार्थ्यांचे स्वागत