डोंबिवलीतील क्रीडा संकुलातील मैदानाची दुरावस्था

डोंबिवलीः डोंबिवली पूर्वेकडील  क्रीडा संकुलातील मैदानाची दुरावस्था झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या मैदानात  क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली असता मैदानाची अवस्था अतिशन वाईट झाल्याने कल्याण डोंबिवली महापालिका (‘केडीएमसी') अधिकाऱ्यांना जाब विचारला व शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी महापािोलका  अधिकाऱ्यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह देत त्यांचा उपहासात्मक सत्कार केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने १०, ११ व १२ जानेवारी आंतरशालेय क्रीडा स्पर्धा भरविण्यात आली होती. स्पर्धेआधी शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी क्रीडा संकुल मधील मैदानाची पाहणी केली असता मैदानाच्या दुरावस्थेमुळे स्पर्धेकांना दुखापत होण्याची शक्यता होती.डोंबिवलीत हाताच्या बोटावर मोजावी इतकीच मैदाने उरली असून उत्सव, महोत्सव,जत्रा याकरिता दिली जातात.महानगरपालिका मैदानाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने  मैदानाची अशी  अवस्था झाली आहे.याच कारणामुळे आम्हाला स्पर्धा पुढे ढकलावी लागत आहे.क्रीडा संकुल मधील मैदान हे फक्त खेळण्याकरता वापरण्यात यावे असे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभा उपजिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर - राणे यांनी पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांना ९ जानेवारी रोजी दिले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. पदाधिकाऱ्यांनी. महापालिका  अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड  यांची भेट घेतली व  निषेध नोंदवत सन्मान चिन्ह देत उपहासात्मक सत्कार केला. यावेळी उप जिल्हा संघटक वैशाली दरेकर - राणे, उपजिल्हाप्रमुख डोंबिवली विधानसभा तात्या माने, उपजिल्हाप्रमुख कल्याण ग्रामीण राहुल भगत, युवासेना जिल्हाधिकारी प्रतिक पाटील, कल्याण ग्रामीण माजी संपर्कप्रमुख अरविंद बिरमोळे, शहर प्रमुख अभिजीत सावंत, उपशहर प्रमुख सुधाकर वायकोळे, प्रदीप हाटे, युवासेना उप जिल्हाअधिकारी परेश काळण, विभाग प्रमुख प्रशांत कारखानीस, सुरेश सावंत, शाखा प्रमुख मंगेश सरमळकर, युवासेना तालुका अधिकारी जयेश म्हात्रे, सुदर्शन जोशी, पंकज कोटकर, वरूण चौहान, मंगेश मोरे, शाखाप्रमुख संजय मांजरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक