एपीएमसी बाजारात भाजीपाला दरात घसरण
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला दरात घसरण होत आहे. हिरवा वाटाणा स्वस्त झाल्याने सर्वच भाज्या स्वस्त झाल्या आहेत, असे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत. सध्या एपीएमसी बाजारात हिरवा वाटाण्याचा हंगाम सुरु झाल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण होत आहे. परिणामी आधी प्रतिकिलो ५०ते ६० रुपयांनी उपलब्ध असलेला मटार दर आता निम्यावर आला असून, प्रतिकिलो ३० ते ३२ रुपये किलो दराने मटार विक्री होत आहे.
साधारणतः एपीएमसी भाजीपाला बाजारात नोव्हेंबर महिन्यापर्यंत हिरवा वाटाण्याची आवक खूप तुरळक प्रमाणात होत असते. हिरवा वाटाण्याच्या मंदीच्या हंगामात आवक कमी असल्याने त्याचे भाव गगनाला भिडत असतात. यावेळी हिरवा वाटाण्याच्या दराने उच्चांक गाठला होता. घाऊक बाजारात २०० रुपये तर किरकोळ बाजारात २५० रुपये किलो दराने हिरवा मटार विक्री होत होता. मात्र, डिसेंबर मध्ये हिरवा वाटाणा उत्पादन वाढण्यास सुरुवात होते. परंतु, यंदा पावसामुळे हिरवा वाटाणा उत्पादनाला फटका बसला होता. त्यामुळे हिरवा वाटाणा आवक कमी प्रमाणात होती. परिणामी हिरवा वाटाणा दर चढेच होते. मात्र, आता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील वाटण्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हिरवा वाटाणा दरात घसरण होत आहे. ८ जानेवारी रोजी एपीएमसी बाजारात हिरवा वाटण्याची आवक वाढली असून, वाटाण्याचा हंगाम सुरु झालेला आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर हिरवा वाटाणा आवक होत आहे. ८ जानेवारी रोजी एपीएमसी बाजारात हिरवा वाटाण्याच्या एकूण ५६ गाड्या आवक झाली. यामधून ४१५८ क्विंटल वाटाणा आवक झाली आहे. त्यामुळे आधी प्रति किलो ५० ते ६० रुपयांनी उपलब्ध असलेल्या वाटाणा आता ३०ते ३२ रुपये दराने विक्री होत आहे. घाऊक बाजारात वाटाणा स्वस्तात उपलब्ध होत असल्याने किरकोळ बाजारातही ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने हिरवा वाटाणा विक्री होत आहे.
गाजर, भेंडी, शिमला मिरची, पलॉवर, कोबी दरात घसरण
एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात ८ जानेवारी पासून भाजीपाला आवक वाढली असून, विशेषतः गाजर, भेंडी, शिमला मिरची, पलॉवर, कोबी या भाज्यांचे दर उतरले आहेत. घाऊक बाजारात कोबीचे दर सर्वात कमी असून, प्रतिकिलो १० रुपये कोबी भाजीचा बाजारभाव आहे. त्यामुळे घाऊक बाजारात सध्या भाज्यांचा स्वस्ताईचा हंगाम सुरु आहे. नोव्हेंबर मध्ये पावसामुळे भाज्यांचे उत्पादन घटले होते. त्यामुळे एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाजीपाला दरात वाढ झाली होती. परंतु बाजारात आता हिरवा वाटण्याबरोबर इतर भाज्या तसेच पालेभाज्यांची आवक वाढली आहे. भेंडी आणि शिमला मिरची दरात प्रतिकिलो २० रुपयांची घसरण झाली आहे.
भाजी आता आधी
वाटाणा २४-२६ २६-३०
गाजर १६-२४ ३०-३५
कोबी १० १६-१८
पलावर १०-१२ १४-२०
भेंडी ३० ५०
शिमला मिरची ४० ६०