अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, अनधिकृत होर्डींग, बॅनर्सवर कारवाई
नवी मुंबई : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलमानुसार नवी मुंबई महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणांवर नोटीस देऊन निष्कासनाची कारवाई करणे, निष्कासनाचा खर्च वसूल करणे, फौजदारी गुन्हे दाखल करणे तसेच तद्अनुषंगिक कारवाई करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत होर्डींग, बॅनर्स, पोस्टर्स विशेष मोहीम घेऊन हटविण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जाहिरात फलक, होर्डींग, बॅनर लावण्यासाठी महापालिकेने जागा निश्चित केल्या असून त्याच जागांवर, विहित आकारमानात जाहिरात फलक, होर्डींग, बॅनर प्रदर्शित करण्यासाठी विहीत नमुन्यात विभाग कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
नमुंमपा कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृत इमारती, अतिक्रमणे, विनापरवानगी जाहिराती, होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती नागरिकांनी महापालिकेला देण्यासाठी विभागनिहाय दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच यावर कारवाई करण्यासाठी संबंधित विभाग कार्यालयाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून विभागनिहाय नियुक्ती करण्यात येत आहे.
नागरिक याविषयीच्या तक्रारी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावरील ग्रिव्हेन्स पोर्टलवर किंवा श्ब् ऱ्श्श्ण्-माझी नवी मुंबई या मोबाईल ॲपवर अथवा ८४२२९५५९१२ या व्हॉटस्ॲप मोबाईल क्रमांकावर दाखल करु शकतात, असे महापालिका तर्फे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, विनापरवानगी बांधकामे करणाऱ्यांविरुध्द महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, १९६६चे कलम अन्वये आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच विनापरवानगी जाहिराती, होर्डिेंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स आढळल्यास संबंधितांविरध्द अधिनियमामधील तरतुदीनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे महापालिका तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
विभाग कार्यालय प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक दूरध्वनी क्रमांक
आयुक्त तथा विभाग अधिकारी
बेलापूर डॉ.अमोल पालवे २७५७३८२६/२७५७०६१०
नेरुळ जयंत जावडेकर २७७०७६६९
वाशी सागर मोरे २७६५५३७०/२७६५९७४१
तुर्भे प्रबोधन मवाडे २७८३४६९
कोपरखैरणे सुनिल काठोळे २७५४२४०६/२७५४२४४९
घणसोली संजय रा. तायडे २७६९२४८९/२७६९८१७५
ऐरोली डॉ. अंकुश जाधव २७७९२११४
दिघा भरत धांडे २७७९२४१०/२७७९२४११
मुख्यालय डॉ. अमोल पालवे २७५६७०६०/२७५६७०६१