मुंबई-नाशिक महामार्ग बनला अपघातांचा महामार्ग
११ महिन्यात ३७ अपघातात ३० जणांचा बळी, २७ जखमी
भिवंडी : भिवंडी तालुक्यांतर्गत येणारा मुंबई-नाशिक महामार्ग सध्या अपघातांचा महामार्ग बनला आहे. गेल्या ११ महिन्यात या महामार्गावर झालेल्या ३७ रस्ते अपघातात ३० जणांना जीव गमवावा लागला असून या अपघातात २७ जण गंभीर जखमी झाले आहेत. याच महामार्गावर २०२३ मध्ये या मार्गावर ३१ अपघात झाले होते. त्यावेळी अपघातात २९ जणांचा मृत्यू झाला होता. तर १९ जण जखमी झाले होते. मुंबई-नाशिक महामार्गाच्या खराब रस्त्यामुळे अपघात होत असल्याचा आरोप वाहन चालकांकडून होत आहे. सुरक्षिततेअभावी अपघात वाढत असल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
सध्या मुंबई-नाशिक महामार्ग ६ पदरी करण्याचे काम ‘एमएमआरडीए'च्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच यासोबतच रस्त्याच्या कडेला बांधलेल्या नाल्यांचेही रुंदीकरण करण्यात येत आहे. अशावेळी वाहनांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही व्यवस्था केलेली नाही. सदैव वर्दळीच्या मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कामांच्या ठिकाणी ना सुरक्षा बॅरिकेटस् बसविले आहेत, ना सिग्नल व्यवस्था आहे. तर सदर मार्ग कोण बनवित आहे? त्याचे फलकही या रस्ते दुरुस्तीच्या आणि नवीन रस्ते बनविण्याच्या मार्गावर लावलेले आहेत. या मार्गावर पथदिव्यांचीही व्यवस्था नसल्याने महामार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सोनाळे फाटा ते कसारा (लतीफवाडी) या ७१ किलोमीटर लांबीच्या मार्गावर ३७ रस्ते बांधण्यात येणार आहेत.
बेदरकारपणे वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे या घटनांची कारणे असून त्यामुळे अपघात घडले आहेत. रस्ते बनविताना आणि रस्ते बनल्यानंतर ठेकेदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात या महामार्गावर अपघातात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत. महामार्गावरील सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला. मात्र, त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी पावसाळी अधिवेशनात मुंबई-नाशिक महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा मुद्दा उपस्थित केला होता. असे असतानाही या महामार्गाची दुरवस्था अजून सुधारलेली नाही. दिवसभरात होणाऱ्या अपघातांबाबत आमदार शेख यांनी दुःख व्यक्त करीत महामार्गावर अपघात होत असल्याचे सांगितले. यानंतरही इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दोन्ही बाजुंनी ट्रॉमा सेंटर नसल्याने दोन्ही यंत्रणा सुरळीत करण्याची मागणी आमदार शेख यांनी केली आहे.
महामार्ग पोलीस विभागाने वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आणि दक्षता वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. महामार्गावर नियम आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच रस्ते सुरक्षा उपाययोजना राबवून आणि जनजागृती द्वारे अपघात कमी केले जातील.
-शरद ओहोळ, सहाय्यक पोलीस आयुक्त-भिवंडी वाहतूक विभाग.