नवी मुंबईतून विमानोड्डाण दृष्टीपथात
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २९ डिसेंबर रोजी पहिले व्यावसायिक विमान यशस्वीपणे उतरले. इंडिगोच्या ए-३२० विमानाने मुंबई विमानतळावरुन उड्डाण करीत, नवी मुंबई विमानतळावर यशस्वी लॅन्डींग केले. प्रवासी विमानाचे यशस्वीरित्या लॅन्डींग झाल्यानंतर नवी मुंबईकरांनी आनंद व्यक्त केला आहे.या यशस्वी लॅन्डींग-उड्डाण चाचणीमुळे आता २०२५ मध्ये नवी मुंबईतून पहिले विमानोड्डाण होण्याची शवयता बळावली आहे.
दरम्यान, ऑवटोबर मध्ये नवी मुंबई विमानतळावर वायुदलाचे सी-२९५ आणि सुखोई-३० या विमानाचे यशस्वी लॅन्डींग होऊन विमानतळावरील धावपट्टीची चाचणी घेण्यात आली होती. या उद्घाटनाच्या लॅन्डीगने केवळ धावपट्टीचीच चाचणी नव्हे तर टॅक्सीवे, हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली आणि एकूण हाताळणी प्रक्रियेचीही चाचणी घेण्यात आली होती.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरु असून त्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंतची डेडलाईन ठरविण्यात आली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये प्रत्यक्ष बांधकाम सुरु झालेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च २०२५ मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
त्याअनुषंगाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २९ डिसेंबर रोजी पहिले व्यावसायिक विमान उतरविण्यात आले. इंडिगोच्या ए-३२० विमानाने नवी मुंबई विमानतळाच्या ०८/२६ क्रमांकाच्या धावपट्टीवर यशस्वी लॅन्डींग केली. यावेळी नवी मुंबईमध्ये विमानाला वॉटर सॅल्युट देण्यात आले. मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलने या लँडिंगचे व्यवस्थापन केले होते. एकदा विमान ५ नॉटिकल मैलांच्या आत आणि १५०० फुट उंचीवर असताना त्याचा मार्ग नवी मुंबई एटीसी टॉवरकडे सोपवण्यात आला. यानंतर विमानाला लँडिंगची दिशा देण्यात आली.
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील काम ऑगस्ट २०२१ मध्ये सुरु झाले असून ते मार्च २०२५ मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर ते ६० दशलक्ष प्रवासी आणि १.५ दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असलेले देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ बनणार आहे. ११६० हेक्टर जागेवर अत्याधुनिक पायाभूत सुविधांव्यतिरिक्त २ समांतर धावपट्टी, एकाचवेळी आणि स्वतंत्र विमान चालवण्यास सक्षम आणि ३ प्रवासी टर्मिनल या विमानतळावर असणार आहेत.