कोपरा गाव प्रवेशद्वार कमानीची दुरवस्था

खारघर : प्रत्येक गावाची एक सीमारेषा ठरलेली असते. गावांची सीमा दर्शविण्यासाठी आणि गावांची शोभा वाढविण्यासाठी पनवेल महापालिका स्थापना झाल्यावर महापालिकेने कोपरागाव आणि खारघर वसाहतच्या मध्यभागी ‘पनवेल महापालिका कोपरा', असा नामफलक असलेले प्रवेशद्वार उभारले होते. परंतु, सदर प्रवेशद्वारची दुरवस्था झाली आहे. सदर प्रवेशद्वार कमानीकडे महापालिका तसेच  लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात असल्याने कोपरा गाव ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.

पनवेल महापालिकेची  स्थापना झाल्यावर महापालिकेने खारघर परिसरातील गावांची सीमारेषा तसेच गावांची ओळख असावी यासाठी खारघर परिसरातील गावांच्या प्रवेशद्वारावर गावाचे नाव दर्शविणारी प्रवेशद्वारे उभारली आहेत.

खारघर सेक्टर-१० मध्ये समावेश असलेल्या कोपरा गावाला लागून वसाहत आहे. पनवेल महापालिकेने खारघर वसाहतीतील कोपरा गावात जाणाऱ्या रस्त्यावर कमान उभारुन त्यावर ‘पनवेल महापालिका कोपरा' असा उल्लेख केला आहे. मात्र, सदर कमानीची दुरवस्था झाली असून, महापालिका आणि गावाचे  नाव असलेल्या टाईल्स निखळल्या आहेत. कोपरा गावाच्या प्रवेशद्वारावरील कमानीकडे महापालिका अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्यामुळे कोपरा गाव ग्रामस्थ नाराजी  व्यवत करीत आहेत. दरम्यान, याविषयी माजी नगरसेवक नरेश ठाकूर यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महेंद्र कोंडे यांच्या ‘बिलोरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन