अनधिकृत फेरीवाले, व्यावसायिक, नारळपाणी विक्रेत्यांवर महापालिका तर्फे तोडक कारवाई

पनवेलः पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे रस्त्यांवर, फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, व्यावसायिकांवर, खाद्य पदार्थ आणि नारळपाणी विक्रेत्यांवर तसेच अनधिकृत बाजारांवर महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी तोडक कारवाई तीव्र करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार चारही महापालिका प्रभागांमध्ये अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई करण्यात येत आहे.

महापालिका तर्फे  खारघर मधील डीमार्ट समोरील १२० अनधिकृत झोपड्या जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी महापालिका सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, प्रभारी अधिक्षक जितेंद्र मढवी यांच्यासह सुरक्षा रक्षक, अतिक्रमण विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामोठे सेक्टर-११ मध्ये फूटपाथवर अतिक्रमण करुन ठेवलेल्या साहित्यांवर अतिक्रमण हटाव कारवाई करुन महापालिका तर्फे सर्व सामान जप्त करण्यात आले. याशिवाय कामोठे सेक्टर-३४ मध्ये रस्त्यावर अनधिकृतरित्या उभारलेल्या खाद्यपदार्थाच्या स्टॉलवरती अतिक्रमण हटाव कारवाई करुन सिलेंडर तसेच रस्त्यांवर ठेवलेले दुकानांचे बोर्ड जप्त करण्यात आले. यावेळी महापालिका सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर उपस्थित होते.

जनार्दन भगत मार्ग रस्त्यावर अनधिकृतरित्या सुरु असलेल्या आईसक्रिम गाड्यांवरती कारवाई करुन तसेच फूटपाथवरील फुलविक्रते, फळविक्रेत्यांवर कारवाई करुन महापालिका तर्फे सामान जप्त करण्यात आले. महापालिका तर्फे साईनगरमध्ये रस्त्यावर अतिक्रमण करुन अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.  पनवेलमधील नया नगर भागातील रस्त्यावर अनधिकृतपणे टपऱ्या बांधून व्यवसाय करणाऱ्यांवर अतिक्रमण विभाग तर्फे कारवाई करुन सामान जप्त करण्यात आले. याशिवाय टपऱ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. महापालिका तर्फे नवीन पनवेलमध्ये वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या २ हातगाड्या तोडून माल जप्त करण्यात आला. पनवेल प्रभागामध्ये  विविध ठिकाणी रस्त्यांवर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या नारळपाणी आणि फळ विक्रेत्यांवर कारवाई करुन अतिक्रमण विभाग तर्फे  फळे जप्त करण्यात आली.

बेलपाडा गॅरेज लाईन परिसरात अनधिकृतरित्या रस्त्यावर ठेवलेले सामान तसेच अनधिकृत फूटपाथवरील बोर्ड वर कारवाई करुन सामान जप्त करण्यात आले.याशिवाय  ॲपीजे हायस्कूल रोड, प्राईम मॉल, शहीद भगतसिंग मार्ग येथे अनधिकृतरित्या फूटपाथवर फळ विक्री करणाऱ्या आणि नारळ पाणी विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागाने कारवाई करुन नारळ जप्त केले.

नवीन पनवेलमध्ये फूटपाथवर अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या नारळ विक्रेते तसेच फळ विक्रेत्यांवर कारवाई करुन सामान जप्त करण्यात आले. याशिवाय रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा करुन व्यवसाय करणाऱ्या फळ विक्री ,भाजी विक्री करणाऱ्या गाड्यांवर महापालिका तर्फे तोडक कारवाई करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोपरा गाव प्रवेशद्वार कमानीची दुरवस्था