‘कुळगाव-बदलापूर नगरपरिषद'च्या शाळांवर आता सीसीटिव्ही वॉच
बदलापूरः ‘कुळगाव-बदलापूर नगरपरिषद'च्या सर्वच शाळांमध्ये सीसाटिव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. शाळेच्या केवळ वर्गखोल्याच नव्हे तर शाळेच्या क्रीडांगण आणि इतर परिसरातही सीसाटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे शाळेतील प्रत्येक घडामोडींवर आता ‘सीसाटिव्ही कॅमेरा'ची नजर राहणार असल्याने नगरपरिषद शाळा अधिक सुरक्षित होणार आहे.
सुमारे ४ महिन्यांपूर्वी घडलेल्या बदलापूर प्रकरणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याची गांभीर्याने दखल घेऊन राज्य शासनाने राज्यातील सर्वच शाळांमध्ये ‘सीसाटिव्ही व्ॉÀमेरा' यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ‘कुळगाव-बदलापूर नगरपरिषद'ने ‘नगरपरिषद'च्या १६ शाळांमध्ये ‘सीसाटिव्ही कॅमेरा' उभारली असून ती कार्यान्वितही करण्यात आली आहे.
‘नगरपरिषद' बदलापूर पूर्वेकडील गांधी चौक येथे असलेल्या डिजीटल मराठी शाळा क्र.१ या शाळेत २९, येथीलच ऊर्दू शाळा क्र.२ येथे १८, डिजीटल मराठी शाळा क्र.३ ज्युवेली येथे २४, मराठी शाळा क्र.४ माणकिवली मध्ये ५, शिरगाव वाजपे येथील मराठी डिजीटल प्राथमिक शाळा क्र.५ येथे ७, मराठी शाळा क्र.६ शिरगांव आपटेवाडी या ठिकाणी ७, कात्रप येथील मराठी शाळा क्र.७ या शाळेत ६, मोहपाडा येथील प्राथमिक मराठी शाळा क्र.९ मध्ये ५, मराठी शाळा क्र.१० हेंद्रेपाडा येथे ४, प्राथमिक ऊर्दू शाळा क्र.१२ बदलापूर गांव या शाळेत ८, सोनिवली येथील मराठी शाळा क्र. १३ येथे ७, वालीवली येथील मराठी शाळा क्र.१४ मध्ये ६, एरंजाड येथील प्राथमिक मराठी शाळा क्र.१५ मध्ये १८, बेलवली येथील प्राथमिक मराठी शाळा क्र.१६ याठिकाणी १३, वडवली येथील प्राथमिक मराठी शाळा क्र.१७ या शाळेत ९, तर मांजर्ली येथील प्राथमिक मराठी शाळा क्र. १८ या शाळेत २ सीसाटिव्ही व्ॉÀमेरे बसविण्यात आले आहेत.
मुख्याध्यापकांकडे ‘सीसाटिव्ही कॅमेरा'चे व्यवस्थापन...
‘कुळगाव-बदलापूर नगरपरिषद'च्या १६ शाळांमध्ये एकूण १६८ सीसाटिव्ही कॅमेरेे बसविण्यात आले आहेत. केवळ वर्गखोल्याच नव्हे तर शाळेचे क्रीडांगण, व्हरांडा, कार्यालय आदि भागातही सीसाटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सर्व ‘सीसाटिव्ही कॅमेरा'चे व्यवस्थापन त्या त्या शाळेचे मुख्याध्यापक बघणार आहेत. सीसीटीव्हीचे फुटेज चेक करणे आणि त्याची नोंद ठेवणे अशी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आली आहे, अशी माहिती ‘नगरपरिषद' शिक्षण विभाग अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.