साने गुरुजींचे काम शिक्षकांसाठी प्रेरणादायी

नवी मुंबई : साने गुरुजींनी केलेलं काम हे शिक्षकांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असून शिक्षक म्हणून काम करताना रूढी, प्रथा, परंपरा,  अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार करण्याचं काम समाजवादी दृष्टिकोन ठेवून साने गुरुजींनी केलं आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना दिली असे प्रतिपादन नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी राजर्षी शाहू महाराज विद्यालय रबाळे येथे केले. साने गुरुजी जयंती कार्यक्रमात ते २४ डिसेंबर रोजी बोलत होते.

यावेळी शाळेच्या विद्यार्थीनी श्रद्धा घाटपारडे व संध्याराणी कावरे, शिक्षिका वैशाली धनावडे, मुख्याध्यापक अमोल खरसंबळे यांनी साने गुरुजींच्या जीवन चरित्राबद्दल इत्यंभुत माहिती सांगितली. सोनवणे यांनी साने गुरुजींनी सविनय कायदेभंग, राष्ट्राच्या उभारणीच्या चळवळीमध्ये योगदान दिले, श्यामची आई पुस्तकाने तर सर्वांच्या घराघरात संस्कार केलं असे समर्पक लेखन केले, लोकांचे प्रबोधन केले असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे यांनी केलं. कार्यक्रमाचे संयोजन मीना सुतार, रोहिणी पाटील, रिंकी कुशवाह, सोनी यादव, अस्मिता सन्मुख यांनी केले. कार्यक्रमास माजी अपक्ष गटनेता गौतमी सोनवणे, मुख्याध्यापिका रंजना वनशा, नेहा मनुचारी, विनायक थिटे, विनोद शेले, मनीषा कांबळे,कावेरी मॅडम यांच्यासह शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘थर्टीफर्स्ट'च्या रेव्ह पाटर्यांवर पोलिसांचा विशेष वॉच