बांग्लादेशी नागरिकांविरोधात धडक कारवाई
नवी मुंबई : खारघर मधील कोपरा गावात तसेच एपीएमसीतील कोपरी गावात बेकायदेशीीररित्या वास्तव्यास असलेल्या १० बांग्लादेशी नागरिकांची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापेमारी करुन अटक केली आहे. यात २ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश असून सदर सर्व बांग्लादेशी नागरिक मागील काही वर्षभरापूर्वी बांग्लादेशातून भारतात आल्याचे आणि तेव्हापासून ते या भागात वास्तव्यास असल्याचे चौकशीत आढळून आले आले आहे. सदर सर्व बांग्लादेशी नागरिक मजुरी आणि घरकाम करुन राहत असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे.
खारघर, सेक्टर-१० मधील कोपरा गांव भागामध्ये काही बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे आणि त्यांच्या पथकाने २१ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास खारघर, सेवटर-१० कोपरा गांव येथे छापा टाकला. यावेळी सदर ठिकाणी बांग्लादेशी १ पुरुष आणि३ महिला बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत त्यांनी २०२३ मध्ये घुसखोरीच्या मार्गाने कोणत्याही वैध प्रवासी कागपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याचे आढळून आले.
त्यांनतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने २२ डिसेंबर रोजी पहाटे वाशी, सेवटर-२६ कोपरी गांव येथे छापा मारला. यावेळी सदर ठिकाणी बांग्लादेशी १ पुरुष आणि ५ महिला बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे तसेच त्यापैकी एका महिलेकडे एक लहान मुल असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा अथवा कागदपत्रे नसल्याचे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीत त्यांनी देखील कोणत्याही वैध प्रवासी कागपत्रांशिवाय घुसखीरीच्या मार्गाने मागील काही वर्षापूर्वी भारतात प्रवेश केल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, सदर दोन्ही कारवाईत अटक ताब्यात घेण्यात आलेले बांग्लादेशी पुरुष बिगारी काम तर महिला या घरकाम करीत असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे. या सर्वांविरोधात खारघर पोलीस ठाणे आणि एपीएमसी पोलीस ठाणे येथे पारपत्र (भारतात प्रवेश) तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान खारघर, सेक्टर-१८ मध्ये मोनिल कबीर खान (४४) नामक बांग्लादेशी नागरिक पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्याकडे पासपोर्ट असून त्याचा व्हिजा एक वर्षापूर्वी संपल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवुन विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाने डिपोर्ट करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
बांग्लादेशी नागरिकांना भाडयाने घर दिल्यास, अथवा त्यांना कामासाठी ठेवल्यास संंबधिता घरमालक, बांधकाम व्यावसायिक किंवा परदेशी नागरिकांना मदत करणाऱ्या इतर व्यक्तींविरुध्द परकीय नागरीक कायदा कलम १४ (क) तसेच रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स ॲक्ट १९३९ कलम ५ अन्वये कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांना सहआरोपी करण्यात येईल, असा इशारा नवी मुंबई पोलीसांकडून देण्यात आला आहे.