‘वात्सल्य'ची लेक बनली लंडन युनिवर्सिटी पदवीधारक

सानपाडा : सानपाडा मधील ‘वात्सल्य ट्रस्ट'ने दत्तक घेतलेली पुजा रौथ या विद्यार्थिनी मिळालेल्या संधीचे सोने करीत लंडन मधील विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. याबद्दल पुजा रौथ हिचे वात्सल्य ट्रस्ट परिवार तसेच ‘वात्सल्य ट्रस्ट'चे शुभचिंतक माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर आणि माजी नगरसेविका सौ. कोमल वास्कर यांनी अभिनंदन केले आहे.

सानपाडा, सेक्टर-४ मध्ये भाड्याच्या घरात वास्तव्यास असलेल्या पश्चिम बंगाल येथील रौथ कुटुंबावर काळाने झडप मारल्याने पुजा आई-वडिलांना मुकली गेली. आई-वडीलांविना अनाथ झालेल्या पुजाला ‘वात्सल्य ट्रस्ट'ने दत्तक घेतले. पुजाचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ३ वर्षापूर्वी लंडन येथील विद्यापीठात शिक्षण पूर्ण करण्याची संधी प्राप्त झाली. ‘वात्सल्य'ने पुजा हिच्या पुढील शिक्षणाकरिता १५ लाख रुपयांची तजवीज करुन तिला लंडनला पाठवले.

१५ लाखातील पहिल्या वर्षाचे ४.५ लाख रुपये फी रुपये आणि ५० हजार रुपये तिला हातखर्चासाठी देत असताना तुझ्या खात्यावर उर्वरित रक्कम जमा आहे, असे ‘वात्सल्य'तर्फे सांगण्यात आले. पण, पुजाच्या खातातून फक्त पहिल्या वर्षाची फी वर्ग झाल्याचे निदर्शनास आल्याने तिला विचारणा केली असता तिने शिक्षणासोबत पार्ट टाईम जॉब केल्यामुळे तिला अतिरिक्त पैशाची गरज भासल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पुजा रौथ हिच्या कामगिरीला सर्वांनीच सलाम ठोकला आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

मेहता महाविद्यालयाचा पॅनोरमा व साय-टेक उत्साहात साजरा