तळोजा फेज-१ मधील आयशा हॉटेल मध्ये अनधिकृत बांधकाम

पनवेल : तळोजा फेज-१ मधील आयशा हॉटेल मध्ये जागेची मर्यादा ओलांडत अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या अनधिकृत बांधकामामुळे तळोजा फेज-१ मधील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज-१ मधील सेक्टर- २ मधील आकार रेसिडेन्सी मध्ये ‘आयशा' नावाने हॉटेल व्यवसाय सुरू आहे. सदर आयशा हॉटेल मालकाने अनधिकृत बांधकाम करुन बाहेरील जागेत किचन तसेच फुटपाथवर देखील अनधिकृत काम केले आहे. याशिवाय अवैधपणे स्वच्छतागृह उभारले आहे. तसेच नावाला हॉटेल व्यवसाय दाखवला जात असून, सदर जागेचा वापर मदरसा म्हणून करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. त्याच अनुषगांने अनधिकृत बांधकाम संदर्भातील फोटो तसेच व्हीडीओ सुध्दा उपलब्ध झाले आहेत. यासंदर्भात तक्रारी करणाऱ्यांना हॉटेल मालकाकडून धमकावण्याचा प्रकार देखील होत आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेकडे केली आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक-३ कार्यक्षेत्रात येणाऱ्या आयशा हॉटेलच्या ठिकाणी विटांचे बांधकाम आणि पत्र्याचे शेड असे जवळपास २०८८ चौरस फूट सर्रासपणे अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या हॉटेलच्या आडून मदरसा चालत असल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडीओतून समोर आला आहे. हॉटेलचा चेहरा समोर करत मागील बाजूने मदरसा सारखे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे सदर बाबतीत कडक कारवाईची मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणाचा उत्सव-महालक्ष्मी सरसचे भव्य उद्घाटन