ठाणे, टिटवाळा येथे २८५ निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान

ठाणे : मानवसेवेचे ब्रिद जपत ‘संत निरंकारी मिशन'ची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे १५ डिसेंबर रोजी ठाणे आणि टिटवाळा येथे आयोजित केलेल्या दोन रक्तदान शिबिरांमध्ये एकूण २८५ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.

ठाणे येथे २०९ युनिट रक्तदान
ठाणे (पूर्व) मधील कोपरी येथील महापालिका शाळा क्रमांक-९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये एकूण २०९ निरंकारी भक्तगणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढी द्वारे १५५ तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय रक्तपेढी द्वारे ५४ युनिट रक्त संकलन करण्यात आले. ठाणे मधील पाचपाखाडी आणि कोपरा ब्रांचमधील निरंकारी भक्तांनी या शिबिरामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला.
या रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन आमदार संजय केळकर यांच्या  हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार ॲड.निरंजन डावखरे, स्थानिक लोकप्रतिनिधी भरत चव्हाण, नारायण पवार, मालती पाटील, मनोज चव्हाण यांच्यासह संत निरंकारी मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.

‘संत निरंकारी मिशन'च्या प्रमुख सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे महाराष्ट्र राज्यातील विविध भागात तसेच देश-विदेशात रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. या व्यतिरिक्त इतरही अनेक सामाजिक उपक्रम मिशन द्वारे सातत्याने राबविले जातात.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी ठाणे सेक्टर संयोजक डॉ. आर.एस. यादव, कोपरी ब्रांच मुखी रवींद्र मोहिते यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल अधिकारी आणि स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली.

टिटवाळा येथे ७६ निरंकारी भक्तांचे रक्तदान

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे टिटवाळा येथील विद्या मंदिर शाळेमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात ७६ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये ६८ पुरुष तर ८ महिला रक्तदात्यांचा समावेश आहे. जे.जे.महानगर रक्तपेढी मार्फत या शिबिरात रक्त संकलन करण्यात आले.

‘संत निरंकारी मंडळ'चे डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या या रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी ‘संत निरंकारी मंडळ'चे कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे, शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर, भाजपा विभाग अध्यक्ष प्रदीप भोईर यांच्यासह स्थानिक प्रबंधकगण आणि सेवादल अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ‘मिशन'च्या मानवतावादी कार्याचे कौतूक केले. मांडा, टिटवाळा, मोहने, आंबिवली, अटाळी तसेच आसपासच्या भागातील निरंकारी भक्तांनी या शिबिरामध्ये भाग घेतला. स्थानिक मुखी खंडू धादवड यांनी सेवादल सदस्यांच्या सहयोगाने या रवतदान शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिंगापूर विद्यापीठ'मधील विद्यार्थ्यांची नमुंमपा भेट