तुर्भे नाका येथे विनापरवाना लॉजिंग आणि बोर्डिंग सुरु

लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासनाची हतबलता

नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून तुर्भे नाका येथे नवी मुंबई महापालिका प्रशासनाची परवानगी नसताना नवी मुंबईतील काही लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने ‘विनायक रेसिडेन्सी लॉजिंग आणि बोर्डिंग' सुरु आहे. या विरोधात १३ डिसेंबर रोजी ‘रिपब्लिकन सेना'चे प्रदेश उपाध्यक्ष खाजामिया पटेल यांच्या नेतृत्वाखाली काही सामाजिक संस्था सदस्य आणि तुर्भे विभागातील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन ‘विनायक रेसिडेन्सी लॉजिंग आणि बोर्डिंग' तात्काळ बंद करा, या मागणीची तड लावण्यासाठी तुर्भे नाका येथे धरणे आंदोलन केले.

तुर्भे नाका येथील विनापरवाना ‘विनायक रेसिडेन्सी लॉजिंग आणि बोर्डिंग' तत्काळ बंद करा, अशी मागणी तुर्भे विभागातील नागरिकांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रशासनाला ‘विनायक रेसिडेन्सी लॉजिंग आणि बोर्डिंग' तत्काळ बंद करणे जमले नाही तर आम्हाला नवी मुंबई महापालिका प्रशासनाने लेखी परवानगी द्यावी, तुर्भे विभागातील सर्वसामान्य नागरिक सदर विनापरवाना ‘लॉजिंग आणि बोर्डिंग' तत्काळ बंद करतील, असे यावेळी समाजसेवक बाळकृष्ण खोपडे-देशमुख यांनी जाहीर केले.

या धरणे आंदोलनात अरमान खुरेशी, फिरोज शेख, रफीक शेख यांच्यासह तुर्भे विभागातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई; फेरीवाल्यांचा आंदोलनाचा इशारा