लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या तर्फे ‘मराठी अर्थशास्त्र परिषद'ला २० लाखाची देणगी

पनवेल : समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेला २० लाख रुपयाची देणगी दिली.

मराठी अर्थशास्त्र परिषद अर्थशास्त्र ज्ञान मराठी भाषेतून जनमानसात घेऊन जाण्याच्या दृष्टीने मागील ४७ वर्षापासून अविरतपणे कार्यरत आहे. मराठी अर्थशास्त्र परिषद तर्फे महाराष्ट्रातील विविध शहरात दरवर्षी अधिवेशन भरवले जाते. परिषद द्वारे विविध उपक्रमांचे आयोजन देखील केले जाते. ‘मराठी अर्थशास्त्र परिषद'ला प्रोत्साहन मिळावे, याकरिता लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘मराठी अर्थशास्त्र परिषद'ला वीस लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. १० डिसेंबर रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी २० लाखाचा धनादेश मराठी अर्थशास्त्र परिषदेला सुपूर्द केला.

यावेळी ‘मराठी अर्थशास्त्र परिषद'चे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. अनिल कुमार वावरे, कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. अविनाश निकम, खजिनदार डॉ. मारोती तेगमपुरे, कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. संजय धोंडे, प्राध्यापक काकासाहेब ढवळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री भागुबाई चांगु ठाकूर यांच्या नावाने परिषद द्वारे पारितोषिके आणि व्याख्यानमाला चालवण्याच्या सद्‌हेतूने भरीव निधी परिषदेला देण्यात आला आहे, अशी माहिती डॉ.  मारोती तेगमपुरे यांनी दिली. तसेच त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बहराई फाउंडेशन तर्फे स्वच्छता मोहीम