मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता सील

कल्याण : कल्याण (पश्चिम) ३/क प्रभाग क्षेत्रातील मालमत्ता कराची रक्कम थकीत असलेल्या मालमत्तांना वारंवार नोटीस देवून देखील मालमत्ता कराचा भरणा मालमत्ताधारक करीत नसल्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांचे निर्देशानुसार तसेच महापालिका उपआयुक्त (कर निर्धारण-संकलन विभाग) स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३/क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात आणि अधिक्षक उमेश यमगर यांच्या पथकाने रक्कम ३६,४४,८३५/- रुपये इतक्या मालमत्ता कर थकबाकी पोटी मालमत्ता सिल करण्याची धडक कारवाई नुकतीच केली.

धडक कारवाई मध्ये कल्याण (पश्चिम) मधील गोविंदवाडी येथील मुसा बिल्डींग मधील शेख मुसा शेख नासीर यांच्याकडील मालमत्ता कर रक्कम १०,६६,३७५/- रुपये थकबाकीपोटी दुकान क्रमांक-१,२,३ आणि ५ सील करण्यात आले.

कल्याण (पश्चिम) मधील आग्रा रोड येथील बोरगांवकर टॉवर मधील धुरापतारी बी.गुप्ता यांच्या मालमत्ता  क्रमांक-सी ०१०१२८५६४००/००४ मालमत्ता कर रक्कम ९१,५३२/- रुपये थकबाकीपोटी सील करण्याची कारवाई करण्यात आली.

कल्याण (पश्चिम) आगरा रोड येथील ममता टॉवर मधील ईश्वरलाल एल.वेलाणी, एम.आर.पटेल, एस.आय.वेलाणी आणि एन.आर.रंगाणी यांच्या मालमत्ता क्रमांक-सी ०१०१४२२६१००/ऑफीस-१ मालमत्ता कर रक्कम ३,१६, ७८०/- रुपये थकबाकीपोटी सील करण्यात आले.

कल्याण (पश्चिम) टिळक चौक येथील लेले आळी मधील स्वप्निल भाऊराव ईरांडे यांची मालमत्ता क्रमांक-सी ०१०१२०७३१००/१०१ मालमत्ता कर रक्कम १७,८९, ४९९/- रुपये थकबाकीपोटी सील करण्यात आली.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांनी कराचा भरणा वेळेवर करुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे तसेच मालमत्ता सील होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.

तसेच कल्याण (पश्चिम) लाल चौकी परिसरातील श्री.बारकु धोंडू ठाकरे यांचे मालमत्ता क्र. ण्02000६2६५00 रक्कम रु. 3,0७,७3६/- इतक्या थकबाकीपोटी सील करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या तर्फे ‘मराठी अर्थशास्त्र परिषद'ला २० लाखाची देणगी