नवी मुंबईतील यमुनाई फाउंडेशनचा राज्यस्तरीय मातृवंदन पुरस्कार सोहळा साजरा

नवी मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित यमुनाई फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यमुनाई राज्यस्तरीय मातृवंदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर कोकण मराठी साहित्य परिषदेचा संस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ पत्रकार मोहन भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण मराठी साहित्य परिषद यमुनाई फाउंडेशनच्या वतीने नवी मुंबईतील  वाशी येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले 

यावेळी कवी संमेलन आयोजित करण्यात आलेले.उपस्थित असणाऱ्या कवींनी सहभाग घेतलेला 

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अशोक पाटील, चित्रपट निर्माते मुकुंद महाले साहित्यिक इकबाल कवारे ,नवी मुंबई मनपाचे सेवानिवृत्त अधिकारी साहेबराव गायकवाड, साहित्यिक भगवान ठाकूर उपस्थित होते 

संस्थेचे अध्यक्ष मोहन भोईर कार्याध्यक्ष चंद्रकांत मढवी श्रीकांत पाटील कवयित्री दमयंती भोईर यांनी मान्यवरांचे स्वागत केले 

वाशी गावचे कवी जयराम पाटील वाशीगावचे फुलचंद भगत यांना मान्यवरांचे हस्ते कोकण मराठी साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कवयित्री संध्या दिवेकर ,पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी ,समाजसेविका राखी पाटील ,कलाकार लोमहर्ष भगत समाजसेवक देवराम मराडे ,समाजसेवक दौलत दुभाषे, समाजसेवक भगवान ठाकूर समाजसेवक रोहन पाटील समाजसेवक संदीप पाटील समाजसेवक अरुण धर्माजी पाटील यांना यमुनाई राज्यस्तरीय मातृवंदन पुरस्कार देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले

पनवेलचे भास्कर पाटील यांना यमुनाई नाट्य महर्षी पुरस्कार तर स्नेहराणी गायकवाड  यांना सहजीवन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले , बापू आजगावकर यांना जीवन गौरव पुरस्कार तर उरणचे राजेंद्र नाईक यांना यमुनाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आईच्या नावाचा हळवा कोपरा प्रत्येकाच्या मनात दडलेला असतो आईच्या ऋणानुबंधनातून उतराई व्हावी म्हणून दरवर्षी मातृवंदन सोहळा आयोजित केला जातो हा सोहळा युवा पिढीसाठी एक आदर्श प्रेरणादायी असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अशोक पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्यासह महसूल वाढीवर भर द्या