नवी मुंबईसह राज्यातील कोळीवाड्यातील घरे, जागा कायमस्वरुपी करण्याची मागणी
नवी मुंबई : छत्रपती शिवरायांच्या आरमारात स्थान असलेला कोळीराजा आज आपल्याच घरात उपरा झाला आहे. एकीकडे २०११ पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत दर्जा मिळाला; पण शेकडो वर्षे असलेला कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले आहे. त्याचबरोबर एकत्र कुटुंब संस्कृतीमध्ये राहत असलेला समाज सध्या त्यांचे वाढते कुटुंब लक्षात घेता कोळीवाड्यातील घरे आणी जागा कायमस्वरुपी नसल्याने घरांची पुनर्बार्ंधणी करताना त्या घरांवर नवी मुंबई महापालिका किंवा सिडको यांच्या मार्फत तोडक कारवाई केली जात आहे. त्यामुळे कोळी बाधवांना घरांची पुनर्बांधणी करताना नाहक त्रास होत असल्याचे लक्षात येताच ‘बेलापूर'च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील कोळी बांधवांची घरे, कोळीवाड्यांचा पुनर्विकास तसेच त्यांची जागा कायमस्वरुपी करण्यासंदर्भात कोळी बांधव आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे.
त्याअनुषंगाने १० डिसेंबर रोजी आ. मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषद मध्ये कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासंदर्भातील माहिती दिली. कोळी बांधव आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक लावून त्याबाबत नियमावली कायद्याच्या चौकटीत बसवून कोळी बांधवांची किचकट नियमांमधून सुटका करुन सदरचा प्रश्न मार्गी लावून कोळी बांधवांना योग्य तो न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याआधी राज्यात काम केलेले असल्याने राज्यातील प्रश्नांची आपल्याला जाण आहे. त्यामुळे शासनाने युध्दपातळीवर कार्यवाही केल्यास त्याचा दिलासा संपूर्ण महाराष्ट्रातील कोळीवाड्यातील बांधवांना मिळणार आहे, असे आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सी. व्ही. रेड्डी, माजी नगरसेवक दीपक पवार, निलेश म्हात्रे, राजू शिंदे, विकास सोरटे, दत्ता घंगाळे, चिंतामण बेल्हेकर, राजू तिकोने, पांडुरंग आमले, सुरेश अहिवले, दर्शन भारद्वाज, जयवंत तांडेल, मंगेश चव्हाण, प्रवीण भगत, प्रवीण चिकणे, नाना शिंदे, सुधीर जाधव, पंकज पाचपुते, कैलास तरकसे, सुहासिनी नायडू, अश्विनी घंगाळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जनतेच्या मनातील आमदार, मग मते फवत १४७५?
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघात ९० हजार मते मिळाली होती. मग, जवळपास २५ माजी नगरसेवकांना आपल्या सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढविलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फवत ९१,४७५ मते मिळाली. म्हणजे यांना राजन विचारे यांना मिळालेल्या मतांपेक्षा फवत १४७५ मतेच जादा मिळाली. याचा अर्थ यांच्यासोबत आलेल्या माजी नगरसेवकांची, नेलेल्या लवाजम्याची मते देखील मलाच मिळाली, असा दावा करीत आ. मंदाताई म्हात्रे यांनी जनतेच्या मनातील आमदार कोण? ते उघड झाल्याचा टोला नाव न घेता संदीप नाईक यांना लगावला. उलटपक्षी मला मागील निवडणुकीत मला ८७,८०० मते मिळाली होती. पण, यंदा मला ९१,८५० मते मिळाली. म्हणजे मागील मतांमध्ये २ ते ३ टववयांची वाढ झाल्याचे त्या म्हणाल्या.
लोकप्रतिनिधी म्हणून कामांबाबत आजही असमाधानी...
मी २००४ पासून काम करीत आहे. पण, जेव्हा कोणते काम मार्गी लागतेय असे वाटते त्याचवेळी कुठेतरी मिठाचा खडा पडतो. मरीनाच्या कामात तसा प्रकार घडला. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची, ग्रामस्थांची घरे कायम होऊ नयेत यासाठीच काही पक्ष-गट आजही कार्यरत आहेत. २००४ पासून पोलिसांच्या घरांच्या, पोलीस वसाहतीच्या नित्कृष्ठ घरांचा प्रश्न आजही तसाच आहे. सभागृहात आवाज उठवल्यानंतर थोडाफार निधी शासनाकडून दिला जातो, त्यात फवत डागडुजीची कामेच होतात. यामध्ये कोणाचीच काम करण्याची इच्छाशवती दिसत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून कामांबाबत आजही मी असमाधानी असल्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांनी स्पष्ट केले.