मानपाडा, मनोरमा नगर, आझाद नगर येथील क्लस्टरबाबत सभा

ठाणे : मानपाडा, मनोरमा नगर आणि आझाद नगर येथील रहिवाशांसोबत नुकतीच क्लस्टरबाबत सभा संपन्न झाली. शहरातील बहुमजली इमारती आणि झोपडपट्ट्या आदिंचा एकत्रित विकास साध्य होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने समूह विकास योजना राबविणारी ठाणे महापालिका राज्यातील पहिली महापालिका आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली वलस्टर योजनेची अंमलबजावणी महापालिकेने सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून सर्व संबंधितांपर्यंत वलस्टर योजना पोहोचावी यासाठी नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे. याच अंतर्गत, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी क्लस्टर सेल कार्यालयात मानपाडा, मनोरमा नगर आणि आझाद नगर येथील नागरिकांना योजनेची संपूर्ण माहिती देऊन त्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी बैठकीस उपस्थित नागरिकांच्या तसेच ‘एकता संघ गाव बचाव कृती समिती'चे पदाधिकारी यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

वलस्टर योजनेच्या संकल्पनेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच योजनेत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

सदर बैठकीस उपायुक्त डॉ. पद्मश्री बैनाडे, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे, कार्यकारी अभियंता महेश रावळ, नगररचनाकार किरण माळगांवकर, उपअभियंता रमेश इनामदार, आदि उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनासाठी बैठक