बी. एस. पाटील इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये वेशभूषा स्पर्धा संपन्न
उरण : उरण तालुवयातील विंधणे येथील बी. एस. पाटील इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये नुकतीच वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थी-विद्यार्थिनींना भारत देशातील विविध वेशभूषेबद्दल माहिती करुन देण्यासाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये आराध्य थळी, मायरा चित्तमपल्ले, श्रीजा जोशी, मितांश पाटील, शौनक पाटील, शौर्य पाटील, क्रिशा ठाकूर, क्रियांश नवाळी, रुद्रांश कोळी, मोक्षा जोशी, सायरा घरत, जियांश पाटील इत्यादी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
भारत देशात विविधतेत एकता आहे आणि त्याचे द्योतक सदर वेशभूषा स्पर्धा आहे, असे मत यावेळी ‘बी. एस. पाटील इंग्लिश मिडियम स्कूल'चे अध्यक्ष कैलास पाटील यांनी व्यक्त केले. या वेशभूषा स्पर्धेत मितांश पाटील हिने प्रथम, मायरा चित्तमपल्ले आणि श्रीजा जोशी यांनी द्वितीय क्रमांक तर क्रिशा ठाकूर आणि क्रियांश नवाळी यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.