विधानसभा निवडणुकीत माहिती-तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर
ठाणे : ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४'करिता २० नोव्हेंबर रोजी माहिती-तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करुन जिल्हा निवडणूक प्रशासनाने सदर निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली. याकरिता ‘राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र'चे जिल्हा सूचना अधिकारी नरेंद्र भामरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करुन जवळपास २८ ॲप्स आणि संकेतस्थळांच्या मदतीने जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
यामध्ये सी-व्हिजील ॲप, इलेक्शन सिझर मॅनेजमेंट सिस्टीम, एन्कोअर-नॉमिनेशन, ॲफिडेविट पोर्टल, एन्कोअर स्क्रुटिनी, एन्कोअर पर्मिशन्स, ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टीम, वोटर टर्नआऊट, एन्कोअर कॉऊंटींग, एन्कोअर एक्सपेंडिचर मॉनिटरींग, एन्कोअर इंन्डेक्स कार्ड ॲण्ड स्टॅस्टिकल रिपोर्टिंग, ईआरओ नेट, इलेक्ट्रॉनिकली ट्रॅन्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम, ऑब्झर्व्हर पोर्टल, इन्टिग्रेटेड इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरींग सिस्टीम, चक्रिका ॲप, पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सॉपटवेअर, पीपीएमएस-एमओ, पीपीएमएस-कॉऊंटिंग, पीपीएमएस-फॉर्म १२, पीपीएमएस-बँक, ऑफलाईन एक्सेल, पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टीम, वोटर सर्व्हिस पोर्टल, सर्व्हिस पोर्टल रजिस्ट्रेशन पोर्टल, नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल, रिझल्ट ट्रेंड टिव्ही, सक्षम ॲप या ॲप्सचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ॲप्सच्या माध्यमातून जिल्हा सूचना अधिकारी नरेंद्र भामरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूकविषयी विविध कामे, अहवाल देणे तसेच सुविधा पुरविणे अशी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.