पनवेल, उरण मधील मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
नवीन पनवेल : ‘विधानसभा निवडणूक-२०२४'च्या निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे. याकरिता १८१ मतमोजणी पर्यवेक्षक, २०४ मतमोजणी सहाय्यक, १६५ मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, १८३ इतर पथकातील अधिकारी (वर्ग-२), ९८६ इतर पथकातील अधिकारी (वर्ग-३), ७३४ चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशी एकूण २,४५३ अधिकारी-कर्मचारी यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
१८८-पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पनवेल ठाणा नाका जवळील (कर्नाळा स्पोर्टस् ॲकॅडमी समोर) अे. आर. कालसेकर पॉलिटेक्नीक कॉलेज येथे होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या २४ आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या २५ आहे. मतमोजणी पर्यवेक्षक ३८, मतमोजणी सहाय्यक ३८, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक ३८, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-२) ४५, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-३) ३१०, चतुर्थ श्रेणी कर्मचारी २२० तर मतमोजणीसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून दुनी चंद्र राणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१९०-उरण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी जासई मधील दि. बा. पाटील मंगल कार्यालय येथे होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या १४ आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या २५ आहे. मतमोजणी पर्यवेक्षक २३, मतमोजणी सहाय्यक २८, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक २३, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-२) १०, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-३) ९०, चतुर्थश्रेणी कर्मचारी ११० तर मतमोजणीसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून राजेश कुमार आयव्ही यांची नियुक्ती करण्यात आली आहे.