खर्च निरीक्षक रमेश कुमार यांची पनवेल विधानसभा निवडणूक खर्च नियंत्रण कक्षास भेट

पनवेल : मतदानानंतर ‘निवडणूक आयोग'ला सादर करावयाच्या अहवालाकरिता नियुवत करण्यात आलेले खर्च निरीक्षक रमेश कुमार (आयआरआस) यांनी २१ नोव्हेंबर रोजी पनवेल, कर्जत, उरण, पेण या विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक खर्च निरीक्षक यांची आढावा बैठक पनवेल महापालिका मुख्यालयात घेतली.

यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त तथा नोडल अधिकारी आचारसंहिता कक्ष भारत राठोड, खर्च संनियंत्रण समिती नोडल अधिकारी (खर्च) मंगेश गावडे आणि निलेश नलावडे, खर्च लेखा पथक प्रमुख संग्राम व्होरकाटे, सहाय्यक खर्च निरीक्षक विजय फासे, संजय आपटे, चंद्रशेखर खामकर, ब्रजेशकुमार, प्रशांत येडे, सुभाष पवार आणि खर्च सनियंत्रण पथकातील सर्व सदस्य उपस्थित होते.

सदर आढावा बैठकीमध्ये निवडणूक कालावधीतील उमेदवारांचा निवडणूक खर्च, जप्त केलेली रोख रक्कम, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू आदि जप्तीबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच आगामी कालावधीत चारही मतदार संघातील निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व उमेदवारांचे निवडणूक लेखे अंतिम करण्याबाबत खर्च निरीक्षकांनी सूचना आणि मार्गदर्शन केले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेल, उरण मधील मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज