अखेर तृतीय पंथीय मतदारांचे मतदान

कल्याण : १४२-कल्याण पूर्व मतदार संघात पोलीस अधिकारी वर्गासमवेत झालेल्या गैरसमजुतीमधून किन्नर पंथीय समुदायाने २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला होता. तथापि, निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी, महापालिका अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेअंती सदर प्रकार गैरसमजुतीमुळे घडला असल्याची कबुली किन्नर समुदायाच्या जिल्हा आयकॉन नीता केणे यांनी दिली. तसेच नीता केणे यांच्या समवेत अनेक किन्नरपंथीय मतदारांनी आपली बहिष्काराची भूमिका मागे घेत मतदान केले.

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या गैरसमजुतीतून सदर प्रकार घडला असून किन्नरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आज सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला मुख्य प्रवाहात आणले जाईल, असा आशावाद नीता केणे यांनी व्यक्त केला.

किन्नर पंथीय मतदारांची गैर समजूत दूर करुन त्यांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी १४२-विधानसभा मतदान संघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक अमित शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त ठाणे संजय जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ, परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, स्वीपचे  जिल्हा नोडल अधिकारी संजय जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी मोलाची भूमिका बजावली.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा  निवडणूक अधिकारी ठाणे अशोक शिनगारे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड देखील याप्रकरणी वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खर्च निरीक्षक रमेश कुमार यांची पनवेल विधानसभा निवडणूक खर्च नियंत्रण कक्षास भेट