मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी पनवेलमध्ये मतदान केंद्रांचे सुशोभिकरण

पनवेल : लोकशाहीचा उत्सव यशस्वी होण्यासाठी ‘निवडणूक आयोग'मार्फत विविध कार्यक्रम जात असून पनवेल मतदार संघ राज्यात मतदान केंद्राचे रोल मॉडेल ठरणार आहेत.

या अंतर्गत १८८-पनवेल मतदार संघातील ११ केंद्रांचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यापैकी ६ पनवेल ग्रामीण आणि ५ पनवेल शहरी. राज्यात प्रथमच सदर अभियान राबविण्यात येत असून पिंक मतदान केंद्राच्या धर्तीवर उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये मतदारांसाठी हेल्पलाईन, सखी मतदार केंद्र, जेष्ठ नागरिक आणि अपंगासाठी विशेष काळजी घेण्यात आली असून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले.

मतदार जनजागृतीसाठी  १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी पवन चांडक, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी १८८-पनवेल आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती पनवेल संदिप कराड, तहसीलदार विजय पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय भालेराव, स्वीप पथक प्रमुख संजय कटेकर, समाज विकास आधिकारी स्वप्नाली चौधरी यांच्या संकल्पनेतून सदर मतदान केंद्रे रोल मॉडेल्स तयार करण्यात आली आहेत.

निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता ‘निवडणूक आयोग'कडून स्वीप अंतर्गत पनवेल हद्दीतील शहरी भागात ५ आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. यामध्ये वेगवेगळ्या थीमवर सुशोभिकरण करण्यात आले. यामध्ये वि्ील वारी, ऑलिंम्पिक, वारली पेंटिंग, महाराष्ट्र टेक्स्टाईल, गड-किल्ले अशा थीमवर मतदान केंद्राचे सुशोभिकरण करण्यात आले.

सदर थीमनुसार तयार करण्यात आलेल्या सर्वच आदर्श मतदान केंद्रावर सेल्फी पाँईंटला मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या अंतर्गत वारी थीमवर तयार केलेल्या आदर्श मतदान केंद्र सुधागड हायस्कुल-कळंबोली येथे मतदानास आलेल्या मतदारांना चंदनाचा टिळा लावून १ हजार तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. या बरोबर विविध संतांची माहिती देणारे फलक लावण्यात आले. आदर्श मतदान केंद्र, खारघर येथे पैठणी थीम तयार करण्यात आली होती. मतदान करुन आलेल्या अनेक मतदारांनी याठिकाणी सेल्फी घेऊन लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला. याचप्रमाणे आदर्श मतदान केंद्र, सेंट जोसेफ हायस्कूल-न्यू पनवेल येथे ऑलिंपिक खेळांवर आधारित थीम राबविण्यात आली होती. याठिकाणी ऑलिंपिक खेळांमध्ये यशस्वी झालेल्या खेळाडूंची माहिती फलक लावण्यात आले. तसेच आदर्श मतदान केंद्र सीकेटी महाविद्यालयात गड-किल्ले थीम राबविण्यात आली. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती, विविध गड-किल्ल्यांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. आदर्श मतदान केंद्र, नेरे येथे वारली पेंटींग अशी थीम घेऊन मतदान केंद्र सुशिक्षित करण्यात आले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

अखेर तृतीय पंथीय मतदारांचे मतदान