नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मतदानाचा जागर
कल्याण : ‘निवडणूक आयोग'ने विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शहरात विविध जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
कल्याण मधील छत्रपती शिक्षण मंडळाची नूतन विद्यालय कर्णिक रोड येथील विद्यार्थ्यांनी मतदानाचा जागर करण्यासाठी प्रिय आई-बाबांना पोस्ट कार्ड पत्र लिहिले. ‘लोकशाही'च्या या उत्सवांमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे या अनोखा सामाजिक मतदान जनजागृती संदेश नूतन विद्यालयाचे उपक्रमशील कलाशिक्षक श्रीहरी पवळे यांच्या संकल्पनेतून १००० विद्यार्थ्यांनी पोस्टकार्ड लिहून अनोखा उपक्रम केला.
२० नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदानाच्या दिवशी सर्व कामे बाजूला ठेवून माझ्या आणि भारताच्या उज्वल भविष्यासाठी प्रिय आई बाबा मतदान जरुर करा. भारताची लोकशाही बळकट करा. विद्यार्थ्यांनी प्रिय आई बाबा यांना लिहिलेल्या पोस्टकार्डवर अतिशय सुंदर स्लोगन लिहिले, मतदानासाठी वेळ काढून आपला हक्क बजवावा. सर्वांनी मतदान करुया तोच देश होईल महान या देशाचे १०० टक्के मतदान. जागरुक नागरिक होऊया, अभिमानाने मत देऊया.
आपल्या मताचे दान. आहे लोकशाहीची शान. अशाप्रकारे संदेश विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षरात पोस्टकार्डवर लिहिली आहेत. या उपक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेश्मा सय्यद यांनी विद्यार्थ्यांचे आणि कलाशिक्षक श्रीहरी पवळे यांचे आणि उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे कौतुक केले आहे. नूतन विद्यालय नेहमीच वेगवेगळे विविध उपक्रम करीत असते, हीच सामाजिक उपक्रमाचे पालक आणि कल्याण मधील प्रतिष्ठित नागरिकांनी उपक्रमास कौतुकाचा वर्षाव केलेला आहे.