राजकारणात संयम, सहनशिलता महत्वाची
नवी मुंबई : जे गेले ते एक्सपोर्ट होते. ते इम्पोर्टच होते. पण, जाताना जीएसटी न भरताच निघून गेले, असा टोला ‘भाजपा'चे बेलापूर विधानसभा मतदारसंघ प्रभारी आ. प्रसाद लाड यांनी ‘भाजपा'ला सोडचि्ीी देऊन ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्ष'मध्ये गेलेले ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार संदीप नाईक यांना लगावला.
वास्तविक पाहता राजकारणात संयम आणि सहनशिलता महत्वाची आहे. पण, संदीप नाईक यांना पक्षनेतृत्वावर विश्वास नसावा. त्यामुळे त्यांनी संयम न बाळगता ‘भाजपा'शी गद्दारी केल्याचा आरोपही प्रसाद लाड यांनी यावेळी केला.
१५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघातील ‘भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती'च्या अधिकृत उमेदवार आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचारासाठी उद्या १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नेरुळ, सेवटर-१२ मधील रामलिला मैदानावर केंद्रिय गृहमंत्री तथा ‘भाजपा'चे राष्ट्रीय नेते अमित शाह यांची जाहीर सभा होत आहे. या सभेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद मध्ये प्रसाद लाड बोलत होते. अमित शाह यांची वैयवितक उमेदवारासाठी सभा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ नोव्हेंबर रोजी घेतलेली सभा सामुहिक उमेदवारांसाठी होती, असे आ. प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी ‘महायुती'च्या उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे, ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, ‘राष्ट्रवादी-अजित पवार गट'चे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, समन्वयक संदीप लेले, सतिश, प्रदेश पदाधिकारी प्रा. वर्षा भोसले, नुकतेच ‘भाजपा'मध्ये प्रवेश केलेले ‘कांग्रेस'चे अनिल कौशिक, राजू शिंदे, दीपक पवार, आदि उपस्थित होते.
संदीप नाईक यांच्या जाण्याचे नवी मुंबईत ‘भाजपा'ला खिंडार पडलेले नसून विरोधकांकडून तशा अफवा पसरविण्यात येत आहेत. ८ नोव्हेंबर पासून दररोज बेलापूर मतदारसंघात फिरत असून यादरम्यान सर्वच ३८४ बुथ प्रमुख, ९४ नारीशवती केंद्र प्रमुख, ३५० पेक्षा प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी माझ्या नियमित बैठका सुरु आहेत. तसेच प्रत्येक बुथ अंतर्गत कार्यकर्त्यांच्या बैठकाही सुरु आहेत. याशिवाय सौ. मंदाताई म्हात्रेे यांनी १० वर्षे या मतदारसंघात आमदार म्हणून तर यापूर्वी विधान परिषद सदस्य म्हणून केलेली कामे जनतेसमोर आहेत. त्यामुळे बेलापूर मतदारसंघात ‘भाजपा'चा विजय पवका असल्याचा दावा प्रासद लाड यांनी यावेळी केला.
तर बेलापूर मतदारसंघातून आपल्याला ‘महायुती'च्या उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांना तिसऱ्यांदा निवडून आणावयाचे आहे. आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची १७ नाव्हेंबर रोजी नेरुळ मध्ये जाहीर सभा होत असून या सभेला ‘महायुती'च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी यावेळी केले.
दरम्यान, सबका साथ-सबका विकास या ध्येयानेच मी आजवर केलेली विकासकामे करुन बेलापूर विधानसभा मतदारसंघात कायापालट घडवून आणलेला आहे. त्यामुळे या कामाची पोचपावती म्हणून भाजपा पक्षनेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून मला ‘बेलापूर'मधून मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मला नुसते निवडून यायचे नसून प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या मताधिववयाने पराभूत करुन आमदारकीची हॅटट्रीक करायची आहे. यासाठी ‘महायुती'मधील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय, पीआरपी पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यासोबतच गांव-गांवठाणासह झोपडपट्टी आणि शहरी भागातही मला मतदारांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे, असे ‘महायुती'च्या उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.