‘आगरी समाज स्नेहसंमेलन'मध्ये आ. राजू पाटील यांचा सन्मान
कल्याण : आगरी वधू-वर सामुदायिक विवाह सोहळा समिती डोंबिवली, डायघर पंचक्रोशी संघर्ष समिती, शेतकरी अन्याय निवारण संघर्ष समिती सोनारपाडा-दावडी यांनी आयोजन केलेल्या ‘आगरी समाज स्नेहसंमेलन'मध्ये ‘मनसे'चे आमदार तथा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजू पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
कल्याण-डोंबिवलीत भौगोलिक प्ररिस्थीती नुसार अनेक समाज वास्तव्याला आले असून त्यांचे हसत स्वागत देखील येथील भूमीपुत्रांनी केले आहे. आजवर विविध समाजांद्वारे बोलविण्यात येते तिथे सत्कार होतो. परंतु, पहिल्यांदाच एका लोकप्रतिनिधीला बोलवून त्याचा सत्कार केला अन् त्याच्या कामाचे जाहीर कौतुक केले गेले. हाच मान सुदैवाने समाजाकडून ‘आगरी समाज स्नेहसंमेलन'मध्ये मिळाल्याने आगरी समाजाने अजून मला ऋणात ठेवले असल्याची भावना राजू पाटील यांनी व्यक्त केली.
सदर सोहळ्याला ‘ठाणे-रायगड जिल्हा वारकरी संप्रदाय'चे अध्यक्ष चेतन महाराज म्हात्रें, आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, भागवताचार्य जयेश महाराज भाग्यवंत, समाज रत्न हनुमान महाराज कोळे, युवा किर्तनकार विनीत महाराज म्हात्रे, ‘२७ गांव संघर्ष समिती'चे जेष्ठ नेते गंगाराम शेलार, अर्जुनबुवा चौधरी, ‘१४ गांव विकास समिती'चे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, ‘डायघर पंचक्रोशी संघर्ष समिती'चे अध्यक्ष संतोष पाटील, आगरी साहित्यिक सर्वेश तरे, आगरी धवलारीन अवनी पाटील, प्रसिध्द गायक परमेश माळी, केतन म्हात्रे, ‘भूमीपुत्र फाऊंडेशन'चे अध्यक्ष सुशांत पाटील, ‘पंचमहाभूत'चे गणेश पाटील यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.