अग्निशमन दलातील जवानांची कर्तव्यदक्षता!

कल्याण: कल्याणचे रहिवासी असलेले आणि मुंबई अग्निशमन दलात कर्तव्य बजावत असलेले गौरव पाटील आणि त्यांच्या इतर दोन सहकारी यांची कर्तव्यदक्षता ९ नोव्हेंबर रोजी पहायला मिळाली. सदर अग्निशामक जवान हे वरळी, मांडवी व इंदिरा डॉक अग्निशमन केंद्र येथे कार्यरत आहेत.

९ नोव्हेंबर रोजी रात्री एका गर्दुल्याने सिगारेट पेटवून टाकल्यामुळे गाडी खाली असणारे गवत व आजूबाजूला असलेले गवत पेटले. त्याचवेळी मुंबईहून नांदेड कडे जाणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेस गाडीच्या डब्याला कसारा घाट येथे आग लागली होती. याच गाडीने प्रवास करणारे अग्निशमन दलातील दोन जवान विकास जाधव (वरळी अग्निशमन केंद्र) आणि अंकुश मदनकर (मांडवी अग्निशमन केंद्र), गौरव पाटील (इंदिरा डॉक) ड्युटी करून सुट्टीसाठी गावी निघाले होते.

नंदिग्राम एक्सप्रेसच्या डब्याला लागलेली आग पाहून त्यांनी मिळेल ते साहित्य वापरुन प्रत्येकाने दोन एक्स्टींग्युशर वापरुन आणि इतर लोकांनी पाणी मारुन डब्यातील बऱ्याच प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यांची सदर समय सूचकता आणि कर्तव्यदक्षता पाहून तेथील प्रवाशांनी त्यांचे कौतुक केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिग्नल यंत्रणा बंद; भिवंडीत वाहतूक कोंडी कायम