आ. मंदाताई म्हात्रे यांचा ‘महायुती'तर्फे उमेदवारी अर्ज दाखल

नवी मुंबई : महाराष्ट्र निवडणुकीचा बिगुल वाजताच संपूर्ण राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्याच अनुषंगाने  भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्षांच्या ‘महायुती'च्या १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज २९ ऑवटोबर रोजी नेरुळ मधील आगरी-कोळी भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांच्याकडे दाखल केला.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे, ‘शिवसेना-शिंदे गट'चे नवी मुंबई संपर्कप्रमुख किशोर पाटकर, ‘राष्ट्रवादी'चे प्रदेश सचिव बाळासाहेब बोरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, भाजपा बेलापूर विधानसभा समन्वयक संदीप लेले, आदि उपस्थित होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नेरुळ, सेवटर-२४ जोटींग देव मैदान येथून ज्वेल ऑफ नवी मुंबई मार्गे रॅलीद्वारे शवतीप्रदर्शन केले. यावेळी असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापूर विधानसभा क्षेत्रातील गेली २५ वर्षापासूनचे जुने कार्यकर्ते आजपर्यंत माझ्या सोबतच आहेत. त्यामुळे ‘माझा कार्यकर्ता हीच माझी मोठी ताकद' असून आज त्यांच्या समवेत मी नामांकन अर्ज दाखल केला आहे. तसेच ‘महायुती'मधील मित्रपक्ष कायमच विकासाचा मुद्दा घेऊनच राजकारणात कार्य करीत आहेत. त्यामुळे आम्ही विकास कामांवरच बोलणार असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबईमध्ये बेलापूर विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आज मी खऱ्या अर्थाने तिसऱ्यांदा निवडणुकीच्या महारिंगणात उतरली आहे. गेली १५ वर्षे नवी मुंबईची सेवा करण्याची संधी मला नवी मुंबईकरांनी दिली त्याचीच पोहोच पावती म्हणून आज मी नागरिकांच्या प्रगतीपथावर प्रलंबित असलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी आणि महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी एकमेव महिला उमेदवार म्हणून दाखल केला, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 महायुती मधील बंडखोरीला आशीर्वाद कुणाचा?