भव्य ‘अभिजात मराठी अक्षर रांगोळी'द्वारे दीपोत्सव

कल्याण : ‘छत्रपती शिक्षण मंडळ'च्या कल्याण मधील नूतन विद्यालय या शाळेच्या मैदानावर २६ रोजी अभिजात मराठी अक्षर रांगोळी काढून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यामुळे शाळेतील कलाशिक्षक सुप्रसिध्द रांगोळीकार श्रीहरी पवळे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या मदतीने ८० फुट या भव्य आकारात शालेय दीपोत्सव कार्यक्रमात अभिजात मराठी अक्षर रांगोळी साकारली. अक्षर कंदील रांगोळीवर गर्जा महाराष्ट्र माझा, मी मराठी माझी मराठी, मराठी असे आमुची मायबोली, जय जय महाराष्ट्र माझा मराठी भाषेला मानाचा मुजरा, बाराखडीची मुळाक्षरे साकारण्यात आली. यासाठी ६०० किलो रांगोळी लागली. विद्यार्थ्यांच्या मदतीने तीन तासात सदर रांगोळी काढली.

उपक्रमशील कला शिक्षक श्रीहरी पवळे सतत विविध कला शैक्षणिक उपक्रम करीत असतात. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेश्मा सय्यद, संस्थेचे पदाधिकारी, पालक आणि प्रतिष्ठित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करीत आनंद व्यक्त केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वच्छ, पर्यावरणशील, प्लास्टिकमुक्त दिवाळीसाठी नवी मुंबईकरांना आवाहन