जनतेच्या प्रचंड उपस्थितीत आमदार गणेश नाईक  यांनी भरला उमेदवारी अर्ज

 

नवी मुंबई : जनतेच्या प्रचंड उपस्थितीमध्ये वाजत गाजत  महायुतीचे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांनी  आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

ऐरोली, सेक्टर-४ मधील स्वर्गीय काळू राघव सोनवणे मैदान येथून  मिरवणूक रॅली काढण्यात आली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय ( आठवले ) आणि मित्र पक्षांचे  कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार श्रीकांत भारतीय, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, शिवसेनेचे नामदेव भगत, भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, आमदार रमेश पाटील, आरपीआयचे सिद्राम ओव्हाळ, महेश खरे, महायुतीचे कार्यकर्ते-पदाधिकारी लोकप्रतिनिधी  उपस्थित होते.

मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी  लोकनेते गणेश नाईक यांनी मंदिरांमध्ये दर्शन घेतले. ठिकठिकाणी   नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले.

नवी मुंबईला विकसित आणि सुरक्षित  ठेवणारे नेतृत्व  आमदार पदी कायम राहावे, अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी  आणि नागरिकांनी व्यक्त केल्या.  जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादात  ही रॅली  सरस्वती विद्यालय येथे पोहोचली. या ठिकाणी  लोकनेते गणेश नाईक यांनी आपला नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे  सादर केला.

1990 पासून  जनतेच्या विश्वासावर  आपण आमदार म्हणून जिंकून येत आहे. या निवडणुकीतही जनतेच्या आशीर्वाद आणि पाठबळ मिळेल असा विश्वास, लोकनेते गणेश नाईक यांनी व्यक्त केला. नवी मुंबईच्या विकासाला गती देऊन  तो पुढे न्यायचा आहे, असा निर्धार व्यक्त करून  महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी एक दिलाने महायुतीच्या  विजयासाठी  काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

कल्याण जिल्ह्यातील जागा वाटपाबाबत ‘काँग्रेस'ची नाराजी