दारु दुकानाविरोधातील यशानंतर आता पर्यावरणासाठी काम

पनवेल : पनवेल मधील एनके हेरिटेज गृहनिर्माण संस्थेतील महिलांच्या गटाने त्यांच्या इमारतीतील दारुच्या दुकानाविरोधातील मोहीम यशस्वी केल्यानंतर, पर्यावरणीय विषयांवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे सुरुवातीला, एनके हेरिटेज सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य वापरत असलेल्या इलेक्ट्रिक बल्बपासून लिथियम बॅटरीपर्यंत ई-कचरा एका समर्पित लाल डब्यात गोळा करण्यास सुरुवात करणार आहेत. सदरचा निर्णय सोसायटी सदस्यांनी आयोजित केलेल्या आभार प्रदर्शनात घेतला.

सामाजिक कार्यकर्ते बी. एन. कुमार, ‘अलर्ट सिटिझन्स टीम' चे निमंत्रक यांनी एकत्रित मोहिमेद्वारे सरकारकडे सदरचा मुद्दा उचलून धरण्यास पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. बी. एन. कुमार यांनी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना पर्यावरणीय समस्यांकडे त्यांच्या नवीन-ऊर्जेचा वापर करण्यास प्रभावित केले. १४ ऑक्टोबर रोजीच्या आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिनाच्या अनुषंगाने एनजीओची आठवडाभर चाललेली ‘लिथियम राक्षस पासून सावध रहा' मोहिम त्यांना समजावून सांगण्यात आली.

यानंतर सदस्यांनी लगेचच या कल्पनेला सहमती दर्शवता घनकचरा वेगवेगळा करुन ई-कचरा गोळा करण्यास सुरुवात केली, असे सोसायटीचे अध्यक्ष अनुराग शुक्ला यांनी सांगितले. ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सरकारी प्रमाणित संस्थेकडे रिसायकलकडे सुपूर्द केला जाईल, असे कुमार म्हणाले.

दरम्यान, इमारतीतील दारु दुकानाविरुध्द मोहिमेच्या यशाबद्दल सोसायटीचे सरचिटणीस नरेश गायकवाड म्हणाले, मुख्यत्वे सर्व सदस्यांच्या एकजुटीमुळे आणि महिला वर्ग मूकपणे विरोध करण्यासाठी बाहेर पडलेल्या मार्गामुळे सदर शक्य झाले. ‘रायगड'चे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महिलांच्या सदर समस्येवर गांभीर्याने विचार करुन गृहसंकुलातील दारु दुकानाला परवानगी न देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी आभार मानले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विभागीय आयुक्तांकडून ठाणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा