खारघर मधील होमियोपॅथी रुग्णालयात १०० दिवसात ८ हजार पेक्षा जास्त  रुग्णांवर उपचार  

खारघर : खारघर मधील केंद्र सरकारच्या होमियोपॅथी रुग्णालयात गेल्या १०० दिवसांत ८१५७ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यात ३७१४ पुरुष तर ४४१६ महिलाचा समावेश आहे. रुग्णालयात २० रुपये नाममात्र शुल्क आकारली जात असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

होमिओपॅथी कोणत्याही आजारांवर उपचार करण्याचा एक नैसर्गिक आणि कायमचा मार्ग असून मूळ कारणावर केल्या जाणाऱ्या उपचारामुळे समस्या कायमची दूर होण्यास मदत होत असल्यामुळे होमियोपॅथी रुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसापासुन वाढ होताना दिसत आहे. २ वर्षांपूवी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने होमियोपथी रुग्णालय सुरु करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या प्रचार आणि वाढत्या प्रसारामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

सदर रुग्णालयात ३० खाटांचा समावेश असून तळ मजल्यावर रिसेप्सन आणि बाह्य रुग्ण विभाग, दुसरा आणि तिसरा माळ्यावर प्रत्येकी १५ खाटाची सोय असून रुग्णालयात प्रयोगशाळा देखील आहे. जुलै ते ऑक्टोबर अशा १०० दिवसात नाममात्र दरात ८१५७ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यात बाल रुग्णापासून ते वयोवृध्द रुग्णाचा समावेश असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

गेल्या १०० दिवसांमध्ये १९९४ वृध्द रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. तसेच त्वचा विज्ञान आणि संधिवात असलेल्या १२७ रुग्णांचा समावेश आहे. सेवांचा लाभ घेतला. विविध आजारावर उपचार करीत असताना विविध भागात जावून नशा मुक्त भारत अभियान, भारतीय अवय दान दिन उपक्रम अंतर्गत रुग्णांमध्ये जागरुकता करण्यात आली. स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमच्या माध्यमातून ११ ठिकाणी स्वच्छता शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा ७८० नागरिकांनी लाभ घेतला.

रुग्णालयाच्या वतीने दाट लोकवस्ती असलेल्या सिध्दार्थ कॉलनी, चेंबूर आणि महाराष्ट्र दक्षता पोलीस सोसायटी रमाबाई कॉलनी आदि ठिकाणी शिबीर घेण्यात आले. तसेच खारघर मध्ये पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांसाठी सफाई मित्र सुरक्षा शिबिर घेवून सफाई कामगारांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. तसेच राष्ट्रीय पोषण महा उपक्रमांतर्गत २५० हून अधिक व्यक्तींना सकस आहार आणि योग्य पोषणाबाबत शिक्षित केले. तर विविध शाळांमध्ये इंग्रजी आणि मराठी भाषेतून  मासिक पाळी विषयी ४०१ मुलींनी माहिती देण्यात आली.

केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद आयुष मंत्रालय भारतचे महासंचालक डॉ. सुभाष कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसांमध्ये खारघर मधील रुग्णालयात होमिओपॅथिक चिकित्सा पध्दतीने ८ हजाराहून अधिक रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात अल्प दरात उपचार उपलब्ध असल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे.
-डॉ. रमेश बावसकर, वरिष्ठ अधिकारी-होमियोपॅथी रुग्णालय, खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केगांव ग्रामपंचायतीची पाणी टंचाई लवकरच दूर