‘काँग्रेस'तर्फे महावितरण कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा
उल्हासनगर : ‘उल्हासनगर शहर काँग्रेस'चे अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली आकाश कॉलनी उल्हासनगर-५ येथील महावितरण कार्यालयावर नागरिकांकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चोत शेकडो नागरिकांनी महायुती सरकार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निषेधार्थ घोषणा करत आपल्या समस्यांचा पाढा वाचला.
उल्हासनगर-४ आणि ५ मध्ये वेळोवेळी खंडीत होणारा वीज पुरवठा, वाढीव लाईट बिल, स्विचिंग स्टेशन, सब स्टेशन आदि समस्या या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने ‘महावितरण'चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीपकुमार बाबुराव कुंभरे, अधिकारी प्रविण चकोले, जितेंद्र फुलपगारे यांच्याशी चर्चा करुन जनतेच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात, अशी मागणी केली.
यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विविध वस्त्यांतील आपल्या वीज समस्या मांडल्या. या जन आक्रोश मोर्चोत माजी नगरसेविका अंजलीताई साळवे, महिला जिल्हाध्यक्ष मनिषा महाकाळे, सीमा आहुजा, सिंधुताई रामटेके, सेवा दल अध्यक्ष शंकर आहुजा, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, सुनील शहरांनी, नाणीक आहुजा, महेश आहुजा, महादेव शेलार, राजेश फक्के, महासचिव दीपक सोनोने, प्रवक्ते आसाराम टाक, नारायण गेमनानी, रोहित ओहाळ, शैलेंद्र रुपेकर, विशाल सोनवणे, संतोष मिडे, आबा साठे, आबा पागारे, मनोहर मनुजा, नाना अहिरे, आदि पदाधिकाऱ्यांसोबत शेकडो महिला-पुरुष सहभागी होते.