नवी मुंबई विमानतळ, नैना महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

नवी मुंबई : ‘सिडको'तर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला पॉवर हाऊसबनविण्याची क्षमता आहे, असे प्रशंसोद्‌गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे काढले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येथे भारतीय वायुदलातर्फे सी-२९५ एअरक्रापटची लँडिंग आणि सुखोई-३० एअरक्रापटची पलायपास्ट चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पाडण्यातआली. त्यानंतर वाशी मधील सिडको प्रदर्शन केंद्र येथे पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ‘सिडको'च्या २६,५०२ सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ, महाराष्ट्र भवन, नैना नगररचना परियोजना ८ ते १२ मधील पायाभूत सुविधा विकासकामे, ठाणे नागरी पुनरुत्थान योजना (नवीन ३८३३ सदनिका), पश्चिम परिघीय (नवी मुंबईआंतरराष्ट्रीय विमानतळ) मार्ग यांचे भूमीपुजन, १८ होल्सच्या आंतरराष्ट्रीय खारघर व्हॅलीगोल्फ कोर्स आणि सेंटर ऑफ एक्सलन्स येथील दर्शक गॅलरी यांचे उद्‌घाटन तसेच ईर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी ‘सिडको'चे अध्यक्ष आ. संजय शिरसाट, खा. श्रीरंग बारणे, खा. नरेश म्हस्के, आ. गणेश नाईक, आ. सौ. मंदाताई म्हात्रे, आ. निरंजन डावखरे, आ. प्रशांत ठाकूर, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. महेश बालदी, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महापालिका आयुवत डॉ. कैलास शिंदे, सह-व्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, गणेश देशमुख, दिलीप ढोले, सह-व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांसह सिडकोतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सिडको'च्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर प्रकल्पांद्वारे मुंबई महानगर प्रदेशाचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास घडवून आणण्याची आणिमहाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता असल्याचे मतही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले. ईर्शाळवाडी दरडग्रस्तांकरिता कमी कालावधीत घरे बांधून ‘सिडको'ने मानवता जपली असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. यावेळी ईर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पातील दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात घरांच्या चाव्यांचे वाटप तसेच ईर्शाळवाडी दरडग्रस्तांपैकी ‘सिडको'मध्ये कंत्राटी स्वरुपात नियुक्ती देण्यात आलेल्या व्यक्तींना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीपत्रे देण्यात आली. याशिवाय ‘सिडको'च्या विविध प्रकल्पांची माहिती देणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रास्ताविकातून व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ‘सिडको'च्या प्रकल्पांविषयी संक्षिप्त माहिती दिली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

अंबरनाथ शिवसेना मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर