शेलघर-कोपर, शेलघर-गव्हाण अंडरपासचे काम पूर्णत्वाकडे!

पनवेल : कामगार नेते महेंद्र घरत यांनी रेल्वे आणि सिडको प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार, सातत्याने पाठपुरावा केल्याने शेलघर-कोपर, शेलघर-गव्हाण अंडरपासचे काम पूर्णत्वाच्या वाटेवर आहे.

सिडको मार्फत नवी मुंबई परिसराचा विकास होत असताना स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच सीबीडी-नेरुळ-उरण रेल्वे लोकल सेवा चालू झाल्यामुळे गव्हाण आणि कोपर येथून शेलघर येथे जाताना अंडरपास नसल्याने वळसा घालून नागरिकांना प्रवास करावा लागत होता. परंतु खरोखरच दूरदृष्टी असलेले कामगार नेते महेंद्र घरत यांनी रेल्वे प्रशासन आणि सिडको प्रशासन यांचा पिच्छा पुरवून वेळप्रसंगी दबावतंत्र वापरुन प्रथम कोपर ते शेलघर अंडरपास मंजूर करुन रस्ता सुरु करुन घेतला. तर आता महेंद्र घरत यांनी गव्हाण ते शेलघर अंडरपास मंजूर करुन घेतल्याने लवकरच नागरिकांना गव्हाण ते शेलघर रस्ता वापरण्यासाठी खुला होऊ शकणार आहे. यामागे दूरदृष्टी असलेले कामगार नेते महेंद्र घरत यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत. आज महेंद्र घरत यांच्या दूरदृष्टीमुळे उरण आणि पनवेल तालुवयातील प्रत्येक गावात मंदिरे, रस्ते, गटारे, समाजमंदिर, शाळा, मैदाने करण्यात यश मिळाले आहे. नागरिकांचा वळसा घालून अतिरिक्त प्रवास वाचल्यामुळे गव्हाण, कोपर, शेलघर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ