नवी मुंबई महापालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये तर करार कर्मचाऱ्यांना २७ हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केला आहे. विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्याअगोदरच  कर्मचारी, अधिकारी यांच्या सानु्ग्रह अनुदान जाहिर करण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी युनियनच्या वतीने महापालिका आयुक्त कैलास शिंदे आणि परिवहन व्यवस्थापकांकडे निवेदनातून पाठपुरावाही केला होता. या निवेदनाची दखल घेत महापालिका आयुक्तांनी दसऱ्यापूर्वीच कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदानाची घोषणा केल्यामुळे युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका मुख्यालयात जाऊन आयुक्त कैलास शिंदे यांचे आभार मानले आहेत.

महापालिकेतील ठोक मानधनावरील कर्मचारी व कायम आस्थापनेतील अधिकारी-कर्मचारी, महापालिका परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावरील वाहक-चालक तसेच रोजंदारीवरील कर्मचारी व कायम कर्मचारी, महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षक व ठोक मानधनावरील शिक्षकांना तसेच तासिका शिक्षकांना सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्याची लेखी मागणी कामगार नेते अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांकडे केली होती.

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ३० हजार रुपये आणि कायम आस्थापनेतील कर्मचारी-अधिकारी ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ३० हजार रुपये आणि कायम आस्थापनेतील कर्मचारी-अधिकारी ४० हजार रुपये, परिवहन विभागातील ठोक मानधनावरील वाहक व चालक तसेच रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना ३० हजार व कायम आस्थापनेतील कर्मचारी-अधिकारी ४० हजार रुपये, ठोक मानधनावरील शिक्षकांना ३० हजार रुपये आणि कायम आस्थापनेतील शिक्षकांना ४० हजार रुपये, तासिका शिक्षकांबाबत मानवतेच्या दृष्टीकोनातून महापालिका प्रशासनाने सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांकडे केली होती. या मागणीची दखल घेत दसऱ्यापूर्वीच सानुग्रह अनुदान जाहीर केल्याने महापालिका आयुक्तांची भेट घेवून रविंद्र सावंत यांनी आभार मानले.

यावेळी शिष्टमंडळात राजेंद्र सुतार मिलिंद आंबेकर ,विजय नाईक,राजेंद्र इंगळे ,कृष्णा घनवट, शिशिकांत ठाकरे, विजय राठोड, अमोल मेच्यकर, महापालिकेच्या सर्व आस्थापनेतील कर्मचारी प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भारताचे ‘अनमोल रतन' हरपले