एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात

वाशी : पावसाळा संपताच थंडीची चाहूल लागल्यावर वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होत असते. या पार्श्वभूमीवर वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात स्ट्रॉबेरी आवक सुरु झाली आहे. ९ ऑक्टोबर रोजी महाबळेश्वर आणि नाशिक येथील २००बॉक्स स्ट्रॉबेरी वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात दाखल झाली असून  महाबळेश्वर स्ट्रॉबेरी फळाचे दर नाशिक स्ट्रॉबेरीपेक्षा अधिक आहेत.

वाशी मधील मुंबई कृषि उत्त्पन्न फळ बाजारात स्ट्रॉबेरी फळाची आवक सुरु झाली आहे. एपीएमसी बाजारात ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये  स्ट्रॉबेरी हंगामाला सुरुवात होते. याआधी फक्त महाबळेश्वर, पाचगणी येथूनच स्ट्रॉबेरी दाखल होत होती. मात्र, दिवसेंदिवस बाराही महिने स्ट्रॉबेरी फळाची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकरी दरवर्षी स्ट्रॉबेरी उत्पादन वाढवत  आहेत. मागील एक ते दोन वर्षांपासून एपीएमसी बाजारात नाशिक येथील स्ट्रॉबेरी दाखल होत आहे. मात्र, महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी चवीला अधिक गोड असल्याने नाशिक पेक्षा महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी फळाला जास्त पसंती देण्यात येत आहे. सध्या बाजारात २०० बॉक्स स्ट्रॉबेरी दाखल होत असून, नाशिक पेक्षा महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीला अधिक दर आहेत. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी प्रतिकिलो ८०० रुपये तर नाशिक येथील ६००रुपये दराने विक्री होत आहे, अशी माहिती फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर