नेरुळ-जुईनगर मधील नागरी समस्या सोडवा; अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन
पोलीस, महापालिका प्रभाग कार्यालयाची जबाबदारी महिला अधिकाऱ्याकडे
खारघर : ६ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या खारघर मधील पोलीस आणि महापालिका प्रभाग कार्यालयाची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांकडे असल्यामुळे महिला समाधान व्यक्त करीत आहे.
खारघर पनवेल महापालिका हद्दीतील सर्वात मोठा नोड असून ६ लाखाहून अधिक लोकसंख्या असून नव्याने डोंगराच्या पायथ्याशी अप्पर खारघर वसाहती टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क आणि काही महिन्यापूर्वी सुरु झालेल्या ‘नवी मुंबई मेट्रो'मुळे आणि ‘सिडको'कडून होवू घातलेल्या कार्पोरेट पार्क मुळे खारघरचे नाव जगभर पसरले आहे. खारघरच्या वाढत्या विकासामुळे शहराच्या लोकसंख्येत भर पडत आहे.
दरम्यान, खारघरच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस ठाण्यात कमी पोलीस बळ असताना जुलै महिन्यात खारघर पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झालेल्या वैशाली गलांडे या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेवून योग्य प्रकारे काम करीत आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात कार्यभार हाती घेताच दरवर्षी पावसाळ्यात खारघर मधील पांडवकडा धबधबा आणि तलाव परिसरात पर्यटकांचा बुडून मृत्यू होत असल्याची माहिती मिळताच पांडवकडा धबधबा आणि तलाव परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवत पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुघटना होणार नाही, याची काळजी घेतल्यामुळे यावर्षी एकाही पर्यटकाचा मृत्यू झाला नाही.
तसेच खारघर परिसरातील शाळा, महाविद्यालयात लैंगिक अत्याचाराच्या सारख्या घटना घडू नये यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी समवेत कार्यशाळा घेवून योग्य मार्गदर्शन करुन शाळा आणि महाविद्यलयात सीसीटीव्ही कॅमेरा असणे आवश्यक असल्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांनी शाळा प्रशासनास दिले. तसेच गणेशोत्सव आणि आता सुरु असलेल्या नवरात्रोत्सव शांततेत पार पाडावा, अशा त्यांनी सूचना मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिकांना कमी पोलीस बळ असताना योग्य प्रकारे कामकाज पाहत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
दुसरीकडे पनवेल महापालिकेच्या खारघर प्रभाग कार्यालय अंतर्गत असलेल्या खारघर आणि तळोजा वसाहत तसेच परिसरातील जवळपास ४० गावांचा खारघर कार्यालयात समावेश होतो. शहर आणि ग्रामीण भागात महापालिकेच्या माध्यमातून योग्य प्रकारे विकास व्हावा तसेच सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या दूर व्हावे यासाठी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी येत्या आक्टोबर महिन्यात स्मिता काळे यांची खारघर प्रभाग अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त पदी जबाबदारी सोपविली आहे. विशेष म्हणजे काळे यापूर्वी नागपूर आणि पुणे शिरुर नगरपरिषदेत काम केले आहे. विशेष म्हणजे शिरुर नगरपरिषदेत काम करताना स्वच्छतेला प्राधान्य देत स्मिता काळे यांनी स्वछता स्पर्धेत नगरपरिषदेला शासनाकडून ५ कोटींचे बक्षीस मिळवून देण्यात मोलाची कामगीरी केली आहे. नागपूर आणि शिरुर या ठिकाणी योग्यरित्या काम करुन त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
खारघर स्वच्छ आणि निटनेटके असावे, अतिक्रमणात वाढ होवू नये, शहराच्या विकासात वाढ व्हावी, खारघर शहर फेरीवाला आणि आठवडी बाजार मुक्त व्हावे आदिंबाबतची जबाबदारी स्मिता काळे यांच्यावर आहे.
या दोन्ही महिला अधिकारी खारघर परिसरात योग्य प्रकारे कामकाज करीत असल्यामुळे महिला वर्गात समाधानाचे वातावरण आहे.