नवी मुंबई बंगाली असोसिएशनच्या वतीने वाशीमध्ये 9 ते 13 ऑक्टोबरदरम्यान भव्य शारदोत्सव
नवी मुंबई : नवी मुंबई बंगाली असोसिएशनच्या वतीने पाच दिवसीय शारदोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वाशी सेक्टर -30 मधील पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या सिडको एक्झिबिशन सेंटर, हॉल नंबर 1 मध्ये हा सोहळा होणार असून, या कार्यक्रमाला 8 लाखाहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शारदोत्सवात नेत्रदीपक दुर्गापूजा तसेच संस्कृती, कलात्मकता आणि सामाजिक भावनेचा मिलाप असणार आहे.
या कार्यक्रमात पश्चिम बंगालमधील कारागिरांनी पवित्र गंगेच्या काठावरील जैव-विघटनशील माती वापरून बनवलेली 18 फूट उंच मूर्ती विशेष आकर्षण असणार आहे. या कार्यक्रमात कोलकाता आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार, अन्वेषा, अनुपम रॉय, आकृती ककर आणि अभिजित भट्टाचार्य यांचे दमदार सादरीकरण होणार आहे. नवी मुंबई बंगाली असोसिएशनच्या वतीने सर्व भाविकांसाठी तीन दिवसीय मोफत भोग वितरणाचे आयोजन करण्यात येणार आहे.
तसेच वंचित मुलांचा रॅम्प वॉक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासह फॅशन शोचा देखील समावेश आहे. हा उत्सव भारताचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करण्याबरोबरच धार्मिक श्रद्धांमधील एकता, परस्पर सौहार्द आणि राष्ट्राच्या परंपरांबद्दलचे प्रेम दर्शवितो. या कार्यक्रमात पारंपारिक पूजा विधींपासून ते देशभरातील कलावंतांच्या उत्कृष्ट निर्मितीचे सादरीकरण्याच्या प्रभावी सोहळ्याचा अनुभव घेता येणार आहे.