मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

नवी मंबई : मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा म्हणून राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील १२  वर्षांपासून संघर्ष करीत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली होती. अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. तो एक समस्त मराठी जणांसाठी आनंदाचा क्षण आहे.

हाच आनंदाचा क्षण ‘मनसे'चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ४ ऑक्टोबर रोजी वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साजरा केला. यावेळी ‘मनसे'च्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन उपस्थित नागरिकांना मिठाई वाटली.

‘मनसे'चे प्रवक्ते तथा शहर अध्यक्ष गजानन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना आणि पोलिसांना देखील पेढे वाटून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासोबत शहर सचिव विलास घोणे, शहर सह सचिव अभिजित देसाई, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष आप्पासाहेब कौठुले, संदेश डोंगरे, श्रीकांत माने, संदीप गलुगडे, अनिकेत पाटील, सनप्रीत तुर्मेकर, दीपाली ढवुल, बाळासाहेब शिंदे, सागर विचारे, श्याम ढमाले, अक्षय भोसले, निखिल गावडे, प्रशांत कोळी, प्रिया कोळी, दत्ता वऱ्हाडी तसेच मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक, स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘काँग्रेस'चा अर्बन नक्षलवादाला पाठिंबा