वन्य जीवांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
उरण : वन विभाग अलिबाग परिक्षेत्र उरण यांच्या माध्यमातून १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. ‘वन्य जीव सप्ताह'चे औचित्य साधून ३ ऑक्टोबर रोजी मोठीजुई येथील पीएनपी हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना वन्य जीवांबद्दल माहिती देऊन वन सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी वन विभागाचे वनपाल डी. एन. दिवीलकर आणि ‘वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था'चे सदस्य तथा पत्रकार महेश भोईर यांनी वन्य जीवांबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वनपाल दिविलकर यांनी सांगितले की, वन्य प्राणी वाचणे गरजेजे आहे. वन्य प्राणी लुप्त पावत चालले आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला फोटोच्या रुपात दाखवावे लागतील. त्यामुळे आपल्या परिसरात किंवा गावांमध्ये प्राण्यांची शिकार करत असतील, तर त्यांना आपण थांबविण्याचे काम केले पाहिजे. पूर्वी जंगल खूप मोठया प्रमाणात असे. मात्र, याच जंगलात मानवाने अतिक्रमन केल्याने मोठ-मोठ्या इमारती डेव्हलपमेंट उत्खनन केल्याने जंगल नष्ट होऊ लागले. त्यात मानव रहित वणवे लावल्याने जंगल, जंगली प्राणी पक्षी, सरपटणारे प्राणी नष्ट होऊ लागले. जंगल आणि जंगलातील पाणी पक्षी वाचविणे काळाची गरज बनली आहे. ते जर थांबले नाही तर येणाऱ्या पिढीला प्राणी, पक्षी, साप फोटो द्वारे दाखवावे लागतील. त्यामुळे आपली जबाबदारी निसर्गाचं संरक्षण करण्याची आहे. अशा प्रकारचे मार्गदर्शन वन्यजीवन निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य महेश भोईर यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी वनरक्षक संतोष इंगोले, राजेंद्र पवार, अनिकेत झेंडे, शाळेचे मुख्याध्यापक किशोर भोईर, शिक्षिका रजनी तांडेल, नामदेव ठाकरे, रंजना मोकल, शशिकांत पाटील, क्लार्क रवींद्र कदम, नितेश पाटील आणि मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते.