‘कसळखंड ग्रामपंचायत'चे सरपंच संजय घरत, सदस्य गिरीश पाटील यांचा समर्थकांसह ‘भाजप'मध्ये प्रवेश
पनवेल : आमदार महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन ‘कसळखंड ग्रामपंचायत'चे सरपंच संजय घरत आणि सदस्य गिरीश पाटील यांनी समर्थकांसह ४ ऑवटोबर रोजी ‘भाजप'मध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ‘शेकाप'ला मोठा हादरा बसला आहे.
उरण येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास आमदार महेश बालदी, ‘भाजप'चे माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, चंद्रकांत घरत, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, माजी सरपंच अनंता पाटील, अनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
‘कसळखंड ग्रामपंचायत'चे सरपंच संजय घरत, सदस्य गिरीश पाटील, रोशन वाघमारे, रविंद्र वाघमारे, सुनील पाटील, बाळाराम वाघमारे, रामदास वाघमारे, रामू वाघमारे यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करुन ‘शेकाप'ला झटका दिला आहे. संजय घरत यांच्या भाजप प्रवेशामुळे कसळखंड ग्रामपंचायतीवर ‘भाजप'चा झेंडा फडकला आहे.