पार्क हॉटेल वर ‘मनसे'ची धडक

नवी मुंबई : ‘मनसे'चे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांची परिवर्तन यात्रा १ ऑवटोबर रोजी सातव्या दिवशी बेलापूर-सीबीडी येथे पोहोचली. यावेळी गजानन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी द पार्क या हॉटेल कडे आपला मोर्चा वळवला. यावेळी ‘मनसे'ने पार्क हॉटेलच्या व्यवस्थापनाला हॉटेल मध्ये एकूण किती स्थानिक काम करतात? याबाबत विचारणा केली. यावेळी तेथील बहुतांश कर्मचाऱ्यांना मराठी बोलता येत नव्हते. यावरुन हॉटेलने राज्य शासनाच्या ८० टक्के स्थानिकांची नोकर भरती या शासन निर्णयाला हरताळ फासल्याचे आढळून आले. त्यामुळे हॉटेलने आपली नोंदणी शासनाच्या कौशल्य, रोजगार-उद्योजकता विभागाकडे का केली नाही? अशी विचारणा गजानन काळे यांनी पार्क हॉटेल प्रशासनाला केली.

येत्या काही दिवसात हॉटेलने एकूण भरतीची माहिती आणि त्यात किती स्थानिक आहेत, याची माहिती ‘मनसे'ला द्यावी, असे सुनावले. जर सदरची माहिती नाही दिली तर मनसे आपल्या पध्दतीने प्रश्न सोडवेल, असे हॉटेल प्रशासनाला सुनावले.  ‘मनसे'च्या सदर शिष्टमंडळात गजानन काळे यांच्यासह महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, शहर सचिव सचिन कदम, महिला सेना उपशहरअध्यक्ष दीपाली ढवुल, शहर सचिव सायली कांबळी, यशोदा खेडस्कर, विभाग अध्यक्ष भूषण कोळी, गणेश भावर, विभाग सचिव श्याम कोळी, उपविभाग अध्यक्ष प्रशांत कोळी, विनोद लांडगे, शाखा अध्यक्ष प्रकाश कोकाटे, किशोर पाटील, चंद्रकांत कोळी, बालाजी लांडगे, महेश सावंत, ‘विद्यार्थी सेना'चे मधुर कोळी, ऋषिकेश पवार, ‘महिला सेना'च्या सुनंदा मोरे, महाराष्ट्र सैनिक सिध्देश जागे, संदेश पाटील आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईत आरोग्य, शिक्षण, रोजगार व्यवस्थेचे धिंडवडे