महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार - अमित शाह

नवी मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचा विजय होणार असून महायुतीचे सरकार येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.

वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रामध्ये शाह यांनी कोकण विभागीय कार्यकर्ता संवाद बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना प्रत्येक कार्यकर्त्याने नियोजनपूर्वक काम करून विजय साकार करावा असे आवाहन केले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री वैष्णवी, भूपेंद्र सिंग, विनोद तावडे, आमदार गणेश नाईक, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, माधवीताई नाईक, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार धैर्यशील पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भाजपा नेते अमित शाह यांचे स्वागत केले.

काँग्रेसने आतापर्यंत तूष्टीकरणाचेच राजकारण केले, असा आरोप करत केंद्रातील भाजपा प्रणित  सरकारने 60 करोड जनतेला अन्न, निवारा वैद्यकीय उपचार निशुल्क उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला देशातील जनतेने सलग तीन वेळा पसंती दिली आहे. देशातील अर्ध्या डझन पेक्षा जास्त राज्यांमध्ये  सलग तीन वेळा भाजपाचे सरकार आले आहे. भाजपा सरकारचा अजेंडा हा भारताचा अजेंडा आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  काँग्रेसने पसरविलेला फेक नरेटीव संपवण्यात भाजपाला बऱ्यापैकी यश आल्याचे म्हटले. राज्यातील परिवर्तनवादी महायुती सरकारने लोककल्याणाच्या आणि राज्याच्या विकासाची अनेक कामे केली असून  झालेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीचे सरकार फक्त स्थगिती सरकार होते. एक तरी ठळक विकासकाम केल्याचे त्यांनी दाखवून द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी निवडणूक जाहीर झाली आहे असे समजून आतापासूनच एक दिलाने  महायुतीच्या घटक पक्षांबरोबर संवाद, समन्वय ठेवून  कामाला लागण्याचे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  पक्षाच्या  संघटनात्मक कामाचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी केले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पार्क हॉटेल वर ‘मनसे'ची धडक