आ. मंदाताई म्हात्रेे यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना पक्की घरे

नवी मुंबई : नागर संस्कृतीपासून दूर आणि अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी बांधव आहेत. सर्वसाधारणपणे जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यात आणि संस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात तुरळक वस्ती करुन आदिवासी राहतात. नेरुळ उरण फाटा येथील डोंगराजवळ वसलेल्या आदिवासी पाडा येथे जवळपास १० ते १५ घरे आदिवासी बांधवांची आहेत. परंतु, या आदिवासी बांधवांची राहती घर पवकी नसल्याने अति पावसाळ्यात त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. येथील आदिवासी बांधवांना पवकी घरे बांधून देण्यासाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ५० लाख रुपयांचा आमदार निधी मंजूर केला आहे. त्याअनुषंगाने आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुवत डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

नवी मुंबई महापालिका तर्फे उरण फाटा येथील आदिवासी बांधवांना पक्की घरे बांधून देण्यात येणार आहेत. याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी तसेच ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करुन लवकरात लवकर भूखंड उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आह.

दरम्यान, उरण फाटा आदिवासी पाडा मधील आदिवासी बांधवांना पक्की घरे मिळणार असून त्यांचे राहणीमान उंचावणार आहे. त्याने त्यांच्या जीवनामध्ये बदल घडविण्याचे काम आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यामुळे होत असल्याने आदिवासी बांधवांनी आनंद व्यवत केला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

'माझी वसुंधरा अभियान ४.०' अभियानात पनवेल महापालिका राज्यात पहिली