नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड करण्याची मागणी

नवी मुंबई : ‘सिडको'शी निगडित विविध समस्या सोडवण्यासंदर्भात शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी शिष्टमंडळासोबत ‘सिडको'चे नवनियुक्त अध्यक्ष आ. संजय शिरसाट यांची भेट घेतली.

नवी मुंबईतील आणि परिसरातील जमिनी फ्री होल्ड करण्यात याव्यात. तसेच ‘सिडको'च्या जुन्या इमारतींची दुरुस्ती करण्यात यावी. ज्या भूखंडावर मंदिर-देवालय उभे आहेत आणि त्या ठिकाणी प्रतिदिन पुजाअर्चा केली जाते त्या ठिकाणचा भूखंड संबंधित मंदीर व्यवस्थापनाला नाममात्र दरात देण्यात यावा. मालमत्ता हस्तांतरीत करताना लागणारे हस्तांतरीत शुल्क रद्द करण्यात यावेत. नवी मुंबईत पुनर्विकासाचे काम सुरु करत असताना सिडको, महापालिका, विमान प्राधिकरण यांच्या ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते, त्यामुळे पुनर्विकासाच्या कामात अनेक अडथळे येत असून विकासकाला आर्थिक भुर्दंडही मोठ्या प्रमाणात सोसावे लागत आहे. म्हणून पुनर्विकास योजना राबवताना एक खिडकी योजना सुरु करण्यात यावी. तसेच नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा सर्वे करण्यात यावा, अशा विविध प्रकारच्या मागण्या आ. संजय शिरसाट यांच्याकडे यावेळी उपनेते विजय नाहटा यांनी निवेदनाद्वारे केल्या.

दरम्यान, सदर मागण्यांच्या अनुषंगाने ‘सिडको'चे अध्यक्ष संजय शिरसाट यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात येतील. तसेच ट्रान्सफर फी तात्काळ रद्द करण्याची खात्री आ. संजय सिरसाट यांनी दिल्याचे विजय नाहटा यांना सांगितले.

यावेळी शिष्टमंडळात शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, अजित सावंत, संजय कपूर,  दीपक सिंग, संजय भोसले, मिलिंद सूर्यराव, श्रीकांत हिंदळकर, उपशहर प्रमुख आतिश घरत, सहसंपर्कप्रमुख भावेश पाटील, कल्पेश पाटील, विभाग प्रमुख नागेश चव्हाण, प्रदीप वाघमारे, मिथुन पाटील, सुरेश काकडे, मंगेश गावडे, विकास गाढवे, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खाडीकिनारी संरक्षक भिंत बांधण्यास वाशी ग्रामस्थांचा पुन्हा विरोध