१.८० कोटींच्या निधीतून श्री बहिरीनाथ वस्ताद सभामंडपाची उभारणी

नवी मुंबई : आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांतून आणि आमदार निधीमधून नवी मुंबई शहरामध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत दिवाळे गावातील कोळी बांधव आपले पारंपारिक सण-उत्सव साजरे करीत असतात. संपूर्ण महाराष्ट्र दिवाळी सणाची वाट पाहत असतानाच दिवाळे गावातील लहान मुले, तरुण-तरुणी, वयोवृध्द मंडळी श्री बहिरीनाथ वस्तादाच्या आगमनाची वाट आतुरतेने पाहत असतात. त्याअनुषंगाने आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या १.८० कोटींच्या आमदार निधीमधून या श्री बहिरानाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची, इतर अत्यावश्यक सुविधा तसेच इतर विकास कामे केली जाणार आहेत. या कामांचे भूमीपुजन २३ सप्टेंबर रोजी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत नमुंमपा आयुवतडॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

दिवाळे गावात दिवाळी सणावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त श्री बहिरीनाथाच्या दर्शनासाठी येत असतात. परंतु, श्री बहिरीनाथाच्या मंदिर गाभाऱ्यात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होते. त्यामुळे भक्तांना बसण्याची व्यवस्था आणि इतर सुविधांसाठी सदर सभामंडप उभारण्यात येत आहे. तसेच दिवाळे गावातील ग्रामस्थांची शाळा गेली ७० वर्षांहुन अधिक जुनी असून ती मोडकळीस आलेली आहे. या शाळेच्या पुनर्विकासासाठी १० कोटींच्या आमदार निधीतून कामाची निविदा जाहीर करण्यात आली असून या कामाचे भूमीपुजन लवकरच होणार असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेता पंढरीनाथ पाटील, माजी नगरसेविका भारती कोळी, श्री बहिरनाथ दीपोत्सव मंडळ सदस्य चंद्राबाई तांडेल, लक्ष्मीबाई तांडेल, फगेवाले मच्छीमार संस्था अध्यक्ष अनंता बोस, डोलकर मच्छीमार संस्था अध्यक्ष तुकाराम कोळी, खांदेवाले मच्छीमार संस्था अध्यक्ष रमेश हिंडे, छाया कला सर्कल ब्रास बँडचे सदस्य श्याम कोळी, प्रेम सागर ब्रास बँडचे सदस्य अशोक कोळी, दिवाळे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष चंद्रकांत कोळी, एकविरा खोपट मच्छीमार संस्था अध्यक्ष सत्कार कोळी, एकविरा मच्छी महिला विक्रेता अध्यक्षा सुरेखा कोळी, राम मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर, करणानी सर, कुमार कोळी, ज्योती पाटील, कल्पेश कुंभार तसेच शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता संजय पाटील, उपअभियंता अजय पाटील, कनिष्ठ अभियंता कांचन वानखडे, प्रज्ञा मोरे, विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सरकारकडून नेहमीच माथाडी कामगारांच्या हिताचे निर्णय -उपमुख्यमंत्री फडणवीस